मुंबई : बंगाली मालिकेत काम करणारी अभिनेत्री ब्रिष्टी रॉय मागील काही दिवसापासून चिंतेत आहे. ब्रिष्टी हिला अनोळखी नंबरवरून पुरूषांचे कॉल येत आहे. अनेकजण या अभिनेत्रीला एस्कॉर्ट म्हणजेच कॉलगर्लसारखे अनेक प्रश्न विचारण्यात येतात. तिच्याशी लोक अतिशय अश्लिल भाषेत बोलत आहे. कोलकाताच्या रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकावर 10 दिवसापासून फलकं लावली आहे.
ज्यात ब्रिष्टी हिचा फोटो, नाव आणि नंबर दिलेला आहे. ते फलक एस्कॉर्ट सेवेचे आहेत. आयएएनएसशी फोनवर झालेल्या संभाषणात ब्रिष्टी रॉय म्हणाली, 'मला शनिवार 24 ऑगस्टपासून अनोळखी नंबरवरून कॉल येत आहेत.
सुरूवातीला मला वाटलं की, कोणी माझी मस्करी करत असेल. मात्र काही दिवसानंतर मला माझ्या एका मित्राचा कॉल त्याने मला लोकल ट्रेनमधील फलकाबद्दल सांगितले. हे फलक एस्कॉर्ट सेवेची जाहिरात होते. ज्यात माझे नाव, फोटो आणि संपर्क क्रमांक देण्यात आला होता.
माझ्या मित्राने फलकाचा फोटो काढला आणि मला पाठविला. माझा फोटो नाव आणि नंबर बघून मला मोठा धक्का बसला. त्यानंतरही मला फार फोन येत होते. अनेकजण प्रत्येकदा मला एस्कॉर्ट सेवेचा दर विचारत होते. काही लोकांना मी विचारलं की, माझा नंबर हा तुम्हाला कुठून मिळाला?, तर त्यांचं एकच उत्तर असायचं एस्कॉर्ट सर्व्हिसच्या जाहिरातीत तुमचा नंबर फोटो आणि नाव दिले आहे.
अनेकजण हे देखील विचारत असत की, फलकावर दिसणारी मुलगी म्हणजे अभिनेत्री ब्रिष्टी रॉय आहे. असे संभाषण ऐकून मला धक्का बसला. त्यानंतर 'मी फोन नंबर बदलण्याचा विचार केला होता, पण आता पोलिसांचा तपास सुरू असल्यानं, मी नंबर बदलवू करू शकत नाही आणि माझे काही महत्वाचे नंबर या सिममध्ये आहे.
ब्रिष्टी म्हणाली की, मी अचानकपणे हा नंबर बदलवू शकत नाही. मी निर्दोष आहे. आणि मला त्रास देण्यासाठी एखादी खोडकर असावा. पण मी सहजतेने सोडणार नाही. मला खात्री आहे की लवकरच दोषी पकडले जाईल.
ब्रिष्टी रॉय यांनी सोनारपूर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. ब्रिष्टी हीने 'बो कोठा काओ', 'तुमई अमाई माईल', 'सुबर्णलता' आणि 'भूमिकन्या' या मालिकांमध्ये काम केली आहे.
ब्रिष्टीने बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या ब्रिष्टी काम करत नाही. या प्रकरणाबद्दल पोलिस अधीक्षक राशिद खान म्हणाले की, या घटनेचा सध्या तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे राशिद खान यांनी सांगितले.