कॉमेडिअन भारती सिंह हॉस्पिटलमध्ये अॅडमीट

काय आहे कारण 

कॉमेडिअन भारती सिंह हॉस्पिटलमध्ये अॅडमीट

मुंबई : कॉमेडिअन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया हे दोघे ही एकाचवेळी रूग्णालयात दाखल झाले आहेत. दोघांनाही डेंग्यू झाल्यामुळे कोकिलाबेन धीरूभाई रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांची ब्लड टेस्ट करण्यात आली. आता या दोघांनाही डॉक्टरांच्या पाहणीत ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांना पूर्ण बरं वाटेपर्यंत रूग्णालयात ठेवण्यात येणार आहे. तसेच आणखी काही टेस्ट करण्यात येणार आहे. 

भारती सिंह आणि हर्ष लिम्बचिया हे दोघं 'बिग बॉस 12'मध्ये दिसणार अशी चर्चा होती. पण हे दोघं ग्रँड लॉच प्रिमिअरला आले देखील नाहीत. मात्र आता अशी माहिती मिळाली की या दोघांनी पैशाची मागणी केल्याचं कळतंय. कारण 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये त्यांना जास्त पैसे मिळाले आहेत. 

टीव्ही जगतातील लोकप्रिय अॅक्शन रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 9' मध्ये कॉमेडिअन भारती सिंह या शोमधून बाहेर पडली आहे. तिचा नवरा लेखक हर्ष देखील या शोचा भाग होता. मात्र तो या शोमधून खूप अगोदर बाहेर पडला आहे.