फोटोज : कॉमेडिअन भारती आणि हर्ष यांनी घेतले सात फेरे

गोव्यात हा शानदार सोहळा पार पडला.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 4, 2017, 11:10 AM IST
 फोटोज : कॉमेडिअन भारती आणि हर्ष यांनी घेतले सात फेरे title=

गोवा : कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिम्बाचिया हे रविवारी विवाहबद्ध झाले. हे दोघे अनेक दिवस एकमेकांना डेट करत होते आता या दोघांचे लग्न झाले.

 

Swag wali Dulhania Mehendi rach gayi hai... Ab countdown begins #bhartikibaraat #bhartiwedshhaarsh #weddingdiaries #gettinghitched #mehendinight

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen) on

शानदार सोहळा

 

Finally hitched!  #gothitched #bhartikibaraat #bhartiwedshhaarsh

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen) on

गोव्यात हा शानदार सोहळा पार पडला. या सोहळ्यात खूप टी.व्ही कलाकार दिसून आले. भारतीने आपल्या लग्नाची खूप तयारी केली होती. लग्न अविस्मरणीय व्हाव यासाठी तिने कोणतीच कसर सोडली नव्हती.

भारती आणि हर्ष दोघांनीही आपल्या प्रेमसंबंधाबद्दल जाहीरपणे सांगितले आहे.

 

Hum hai rahi pyaar keHappily Married #bhartikibaraat #bhartiwedshhaarsh

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen) on

दोघांच्या लग्नाच्या चर्चा गेले अनेक दिवस रंगली होती.ॉ

भारतीचा ड्रेस

भारतीचा लग्नातील पेहराव हा अध्याने डिझाइन केला होता. तिने पिंक कलरचा लेहंगा आणि ब्लू कलरचा ब्लाऊज परिधान केले होते. 

कलाकारांची हजेरी 

मनीष पॉल, कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोव्हर, जय भानुशाली अशा छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

अशी जुळली कहाणी

हर्षने भारतीला प्रपोज केले नव्हते, तर फक्त 'मी तुझ्यावर प्रेम करतो' असा एकदा मेसेज केला होता. त्यानंतर १५ ते २० दिवस त्यांच्यात काही बोलणे झाले नव्हते. 
त्यानंतर हर्षने तिला लग्नासंबंधी विचारले आणि भारतीने होकार दिला. त्यानंतर हे नातं पुढे सरकल.'नच बलिये' मध्ये या दोघांची जोडी सर्वांना आवडली होती.

(सर्व फोटो साभार- इंस्टाग्राम)

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x