प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाल्यानंतर अभिनेत्री प्रियांका पंडितची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली....

अभिनेत्री प्रियांकाने यावर उघडपणे बोलून काही खास लोकांवर आरोप केले आहेत.

Updated: Aug 28, 2021, 09:02 PM IST
 प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाल्यानंतर अभिनेत्री प्रियांका पंडितची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली.... title=

मुंबई : भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधूचा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा प्रायवेट व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, असाच एक व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता, ज्यावर अनेकांनी आरोप केला की ती मुलगी दुसरी तिसरी कोण नाही तर भोजपुरी अभिनेत्री प्रियंका पंडित आहे. मात्र, अभिनेत्री प्रियांकाने यावर उघडपणे बोलून काही खास लोकांवर आरोप केले आहेत.

काय आहे प्रकरण 
भोजपुरी अभिनेत्री प्रियंका पंडित अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आली होती. जेव्हा हा खाजगी व्हिडिओ व्हायरल झाला, तो सोशल मीडियावर पसरला की व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी दुसरी कोणी नाही तर प्रियांका पंडित आहे. एमएमएस व्हिडिओ क्लिपिंग व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांनी भोजपुरी अभिनेत्री प्रियंका पंडितने या प्रकरणी आपलं मौन तोडलं आहे.

काय म्हणाली प्रियांका 
 अहवालानुसार, प्रियांका पंडित म्हणाली की, मी व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी नाही. माध्यमांशी बोलताना ती म्हणाले की, हा एक जुना व्हिडिओ आहे जो त्रिशाच्या एमएमएस घोटाळ्यानंतर पुन्हा समोर आला आहे. प्रियांकाने आरोप केला की, कोणीतरी तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तिची चित्रपट कारकीर्द खराब होईल आणि म्हणूनच हा विशिष्ट व्हिडिओ व्हायरल केला गेला आहे.

लेखी तक्रार दाखल
प्रियांका पंडितने या प्रकरणाबाबत लेखी तक्रार  केली होती. प्रियांका पंडित सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते आणि दररोज तिच्या पोस्ट शेअर करत राहते.