close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'भूल भुलैया २' चं पोस्टर रिलीज होताच ट्विटरवर २ गट

चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित होताच अक्षय आणि कार्तिकच्या चाहत्यांमध्ये वाद होताना दिसत आहे.

Updated: Aug 19, 2019, 05:58 PM IST
'भूल भुलैया २' चं पोस्टर रिलीज होताच ट्विटरवर २ गट

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने अनेक हीट चित्रपटांमध्ये आपली भूमिका चोखरित्या बजावली आहे. त्यापैकी एक म्हणजे विनोदी 'भूल भूलय्या' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केले होते. आता चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भुमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित होताच अक्षय आणि कार्तिकच्या चाहत्यांमध्ये वाद होताना दिसत आहे.

चित्रपटात अक्षयची जागा कोणी दुसरा अभिनेता घेवू शकत नसल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. मुख्य स्थानी असलेल्या कार्तिकचा 'भूल भुलैया' चित्रपट ३१ जुलै २०२० मध्ये रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. भूषण कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. 

चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित होताच चाहत्यांकडून टीकेची झोड उठवण्यात आली. कार्तिक आर्यनला अशा भूमिका साजेशा नसल्याचे एका नेटकऱ्याने सांगितले आहे. नेटकऱ्यांकडून चित्रपटासाठी कार्तिकची निवड नेटकऱ्यांना भोवली नसल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून समोर येत आहे.

पोस्टरमध्ये कर्तिक २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या  'भूल भुलैयातील' अक्षयच्या भुमीकेत दिसत आहेत. त्यामुळे रुपेरी पडद्यावर कार्तिक अक्षयसारखी जादू दाखवणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बाज्मी करत आहेत.