भूमी पेडणेकरचा दिलकश अंदाज...

भूमी पेंडणेकरने फोटोशूटमधील हा बिनधास्त अंदाज पाहुन चाहते चकीत होतील.

Updated: Jun 28, 2018, 02:31 PM IST
भूमी पेडणेकरचा दिलकश अंदाज... title=

मुंबई : भूमी पेंडणेकरने फोटोशूटमधील हा बिनधास्त अंदाज पाहुन चाहते चकीत होतील. एक हॉट बोल्ड फोटो भूमीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तिने वाईन रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केला आहे. तिची अदा मादक आहे. या फोटोत तुम्हाला फिट भूमी पाहायला मिळेल. खरंतर पहिल्या सिनेमासाठी भूमीने तिचे वजन खूप जास्त वाढवले होते. त्यानंतर खूप मेहनत घेत तिने ते कमी केले आणि आता अतिशय आकर्षक अंदाजात ती आपल्यासमोर आली आहे. आपल्या चाहत्यांना खूश करण्याचा तिचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरेल.

भूमी पेंडणेकरने २०१५ मध्ये आलेल्या 'दम लगा के हईशा' या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. त्या सिनेमासाठी तिने खूप वजन वाढवले होते. पहिल्याच सिनेमासाठी तिला फिल्म फेअरचा सर्वोकृष्ट नवोदीत अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सध्या ती सोन चिरैया या सिनेमात व्यस्त आहे. यात तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूत झळकणार आहे. 

'टॉयलेट एक प्रेम कथा', 'शुभ मंगल सावधान' या सिनेमातील तिचे कामही प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले. 

 

Good Morning #hello #sunday #mornings #love

A post shared by Bhumi Pednekar (@psbhumi) on