बिग बी म्हणतात तनुश्री खुपच शूर...

 बिग बींचं हे वक्तव्य ऐकून स्पर्धकाने देखील तिचं कौतुक केलं.

Updated: Oct 21, 2019, 03:06 PM IST
बिग बी म्हणतात तनुश्री खुपच शूर...

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती ११' शोमध्ये जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन स्पर्धकांसोबत प्रश्न उत्तरांचा खेळ खेळत असतात. प्रश्न उत्तरांच्या या रंगलेल्या खेळात बिग बीं हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाला अभिनेत्री तनुश्री दत्ता संबंधतीत प्रश्न विचारला. 'हा आवाज कोणत्या अभिनेत्रीचा आहे, जिने पहिल्यांदाच मीटू मोहिम भारतात उदयास आणली?'

या प्रश्नाचे पर्याय तनुश्री दत्ता, टीना दत्ता, कंगणा रनौत आणि मंदाना करीमी देण्यात आले होते. या प्रश्नाचे उत्तर त्या स्पर्धकाने बरोबर दिले. तिच्या बद्दल सांगताना बिग बी म्हणाले 'तनुश्री दत्ता फेमिना मिस इंडिया होती. त्याचबरोबर ती अभिनेत्री देखील आहे.'

ती फार शूर आहे. बिग बींचं हे वक्तव्य ऐकून स्पर्धकाने देखील तिचं कौतुक केलं. त्याचबरोबर बिग बींकडून मिळालेल्या प्रतिक्रियांनंतर स्पॉटबॉयने तनुश्रीसोबत संवाद साधला. मी जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची आभारी असल्याचे तनुश्रीने सांगितले.