झुंडमध्ये नागराज मंजुळेसोबत काम करत असल्याची बीग बींची अधिकृत घोषणा

बीग बींनी नाळ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर केला शेअर

Updated: Nov 11, 2018, 04:29 PM IST
झुंडमध्ये नागराज मंजुळेसोबत काम करत असल्याची बीग बींची अधिकृत घोषणा title=

मुंबई : झुंडमध्ये नागराज मंजुळेसोबत काम करत असल्याची अधिकृत घोषणा अमिताभ बच्चन यांनी केली आहे. नाळ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करून त्यांनी ही माहिती दिली. नाळ आणि सैराट बनवणाऱ्या नागराज मंजुळेसोबत लवकरच 'झुंड' चित्रपटाचं शुटींग करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

झुंड या सिनेमात अमिताभ बच्चन एका रिटायर्ड स्पोर्ट्स टीचरच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका झोपडपट्टीत ते फुलबॉलची सुरुवात करतात. सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. भूषण कुमार या सिनेमाचे निर्माते असून नागराज मंजुळे या सिनेमाचं दिगदर्शन करणार आहेत. याआधी ही अमिताभ बच्चन यांनी शिक्षकाची भूमिका केली आहे. त्यांचे अनेक सिनेमे यशस्वी देखील ठरले.

ब्लॅक सिनेमात देखील बीग बींनी शिक्षकाची भूमिका निभावली होती. प्रकाश झा यांच्या आरक्षण सिनेमात देखील त्यांची भूमिका प्रेक्षकांनी पसंत केली होती. सध्या ते महबूब स्टूडिओमध्ये ब्रह्मास्त्र सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. आलिया आणि रणबीर कपूर या सिनेमात असणार आहेत.