'बिग बॉस 12' विजेती दीपिका कक्कर दिसणार 'या' अंदाजात

संदीप सिकंदच्या काल्पनीक कथेच्या माध्यमातून दीपिका प्रक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Updated: Feb 5, 2019, 02:16 PM IST
'बिग बॉस 12' विजेती दीपिका कक्कर दिसणार 'या' अंदाजात title=

मुंबई: 'बिग बॉस 12' विजेती दीपिका कक्कर इब्राहिम लवकरच पून्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. संदीप सिकंदच्या काल्पनीक कथेच्या माध्यमातून दीपिका प्रक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही एक परंपरागत प्रेमकथा असणार आहे. या कथेद्वारे करण ग्रोवर-दीपिका कक्कर पहिल्यादाच छोट्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. संदीपने दीपिकाला 'बिग बॉस 12' मध्ये जाण्याआधीच मालिकेसाठी अप्रोच केले होते. 'बिग बॉस 12' रियलिटी शोतून बाहेर पडल्यानंतर दीपिकाने निर्मात्याशी संपर्क साधाण्याचा प्रयत्न केला. पण कास्ट फायनल झाली असावी अशा विचाराने तिने निर्मात्याशी संपर्क केला नाही. याविषयी दीपिका-संदीप कडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

we did it!!!!! thers nothing above being honest to yourself in any and every walk of life... and that is what has made us win hearts and achieve this!!! Dil se thank you to everyone who has supported me... all the fans who have showered immense support and love..it has been a journey with a lot of ups n downs not just for me but even for my loved ones outside... lot of criticism faced and lots of memories created!!! This trophy is from you all for you all.. lots of love and a happy new year to all #stayblessed . . . . Outfit :- @kalkifashion Jewellery :- @adan_creation_ . . . #dipikakakaribrahim #bb12 #colorstv @colorstv @endemolshineind @viacom18 #dipstars

A post shared by Dipika (@ms.dipika) on

 

सूत्रांच्या सांगण्यानुसार 'ही मालिका अशा दोन लोकांच्या प्रेमकथेवर आधारित आहेत, जे त्यांच्या प्रेमाला आणखी एक संधी देण्याच्या विचारात आहेत'. 'ससुराल सिमर का' या मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहचलेली सिमर एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. 

दीपिका कक्करने अभिनयाची सुरुवात 'नीर भरे तेरे नैना देवी' या मालिकेच्या माध्यमातून केली. नंतर तिने 'ससुराल सिमर' या मालिकेच्या माध्यमातून दमदार एन्ट्री केली. या मालिकेतून सिमरच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. चाहत्यांही मालिकेला डोक्यावर घेतले. नंतर तिने 'बिग बॉसच्या घरात एन्ट्री करुन 'बिग बॉस12' च्या ट्रॉफीवर स्चत:चे नाव कोरले.