'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या आयुष्यातील कटू सत्य, 'वडिलांनीचं माझ्यासोबत शारीरिक...'

अभिनेत्रीने वडिलांच्या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून सोडलं घर  

Updated: Dec 5, 2021, 10:34 AM IST
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या आयुष्यातील कटू सत्य, 'वडिलांनीचं माझ्यासोबत शारीरिक...'

मुंबई : कलाविश्वात अभिनेत्री त्यांना आलेले अनुभव उघडपणे सांगतात. आता बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फी जावेदने तिला लहानपणी आलेला एक भयानक अनुभव मुलाखतीत प्रेक्षकांना सांगितला. उर्फी जेव्हा 11 वीत होती तेव्हा तिच्या एका मित्राने तिचे काही फोटो एडल्ट साईट्सवर पोस्ट केले. तेव्हा उर्फी वाईट काम करत असल्याचा समज तिच्या संपूर्ण कुटुंबाला झाला. कुटुंबातील एकाही सदस्याने तिचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. 

उर्फी म्हणाली, 'घडल्या प्रसंगानंतर माझं म्हणणं कोणीही ऐकून घेतलं नाही. मी पोर्न स्टार म्हणून छुप्या पद्धतीने काम करत असल्याचं माझ्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना वाटले. कठीण प्रसंगी माझी साथ देण्याशिवाय माझ्या कुटुंबाने माझा विरोध केला. माझ्या वडिलांनी माझा छळ केला...' 

पुढे उर्फी म्हणाली, 'वडिलांकडून माझा सतत मानसिक आणि शारीरिक छळ व्हायचा. ते कायम म्हणायचे नातेवाईकांना तुझं बँक अकाउंट चेक करायचं आहे. त्यांचे नातेवाईक मला पॉर्न स्टार म्हणायचे.' प्रकरण कळाल्यानंतर उर्फीला 2 वर्ष घरात कोंडून ठेवण्यात आलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्फी जावेदने सांगितले की, 'हे सर्व माझ्यासोबत दोन वर्षे चालले. या छळामुळे मी माझे नावही विसरले होते. घरची परिस्थिती पाहून ती दोन बहिणींसह घरातून पळून दिल्लीत आली. आठवडाभर दिल्लीतल्या एका पार्कमध्ये राहीली. 

त्यानंतर उर्फीने  कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळवली. काही दिवसांनी वडिलांनी दुसरं लग्न केल्याचं तिच्या कानावर आलं. त्यानंतर आई आणि आणखी दोन भावांची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आली. आज उर्फी टीव्ही अभिनेत्रींपैकी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

'बिग बॉस'च्या माध्यमातून प्रसिद्धझोतात आलेली उर्फी कायम तिच्या विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. काही युजर्स तिच्या फोटोंवर पसंती दर्शवतात तर काही मात्र तिला तिच्या विचित्र स्टाईलमुळे ट्रोल करतात.