BiggBoss 11 चे पर्व जिंकल्यानंतर शिल्पाच्या 'एक्स बॉयफ्रेंड'ने दिल्या खास शुभेच्छा

बिग बॉस 11 मध्ये किचन क्वीन ते 'आई' अशा भूमिकांमध्ये असणार्‍या शिल्पा शिंदेला घरात आणि घराबाहेरही प्रेम मिळाले.

Updated: Jan 15, 2018, 03:18 PM IST
BiggBoss 11 चे पर्व जिंकल्यानंतर शिल्पाच्या 'एक्स बॉयफ्रेंड'ने दिल्या खास शुभेच्छा title=

 मुंबई : बिग बॉस 11 मध्ये किचन क्वीन ते 'आई' अशा भूमिकांमध्ये असणार्‍या शिल्पा शिंदेला घरात आणि घराबाहेरही प्रेम मिळाले.

शिल्पाच्या फॅन्सनी व्होट्सच्या माध्यमातून, सोशल मीडीयाच्या माध्यमातून प्रेम दाखवले. 

 
 विकास आणि शिल्पाच्या संबंधांमध्ये बदल 
 

 बिग बॉस 11चा सीझन सुरू झाला तेव्हा विकास आणि शिल्पामध्ये अनेक भांडणं झाली. मात्र शो संपेपर्यंत त्यामध्ये अनेक बदल झाले. आता ते चांगले मित्र झाले आहेत. 
 
 विजेतेपद  पटकवल्यानंतर शिल्पा शिंदेवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. दरम्यान शिल्पाचा बॉयफ्रेंड रोमित राज यानेदेखील शिल्पाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 रोमित राजचं ट्विट 

 
 रोमित राजने शिल्पाला शुभेच्छा देताना ती मोस्ट डिझर्व्हिंग आणि उत्तम स्पर्धक असल्याचा उल्लेख केला आहे. शिल्पा आणि रोमितच्या रिलेशनशिपला 'मायका' या मालिकेपासून सुरूवात झाली. मात्र त्यांच्यामध्ये दुरावा आल्याने लग्न झाले नाही. त्यांच्यामध्ये मतभेद असल्याने ते एकमेकांपासून दूर गेले.  

 
शिल्पा दर्शकांच्या पसंतीची 

शिल्पा शिंदे सुरूवातीच्या काळात विकाससोबत भांडण केल्याने चर्चेत आली. त्यानंतर घरात शिल्पा वयस्कर असल्याने इतर स्पर्धकांची काळजी घेताना दिसली. मात्र सुरूवातीपासूनच शिल्पाने घरात तिचं अव्वल स्थान राखलं होतं.