'या' गंभीर आजाराशी झुंज देतोय अभिनव शुक्ला

आजकाल अभिनव 'खतरों के खिलाडी 11 मध्ये दिसत आहे. 

Updated: Aug 10, 2021, 04:34 PM IST
'या' गंभीर आजाराशी झुंज देतोय अभिनव शुक्ला title=

मुंबई : अभिनव शुक्ला, जो बिग बॉस 14 मध्ये एक दमदार स्पर्धक होता, आजकाल अभिनव 'खतरों के खिलाडी 11 मध्ये दिसत आहे. अभिनवने सलग दोन रिअॅलिटी शो केले आणि दोन्हीमध्ये त्याला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. त्याचवेळी, त्याची पत्नी आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलीक बिग बॉस 14ची विजेती होती.

रुबीना आणि अभिनव हे गोव्यात सुट्टी घालवताना दिसत आहेत. दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. बिग बॉस नंतर लगेजच, नेहा कक्करने या दोघांचा मरजानिया हा अल्बम रिलीज केला. याचबरोबर नुकतंच या कपलचं नवीन गाणं 'तुमझे प्यार है' हे देखाल रिलीज झालं आहे. ज्याला लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे.

दरम्यान, अभिनवने त्याच्या गंभीर आजाराबद्दलचा खुलासा केला आहे. खतरों के खिलाडीच्या अलीकडच्या भागात अभिनव आणि श्वेता तिवारी यांच्यात भांडण झालं होतं. ज्यात त्यांना टास्क दरम्यान काही अडचणी येत होत्या.

शो संपताच अभिनवने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आणि त्याच्या आजाराबद्दल सांगितलं. त्याने लिहिलं की, ''मला बॉर्डरलाईन डिस्लेक्सिक आहे. आता प्रत्येकाला हे माहित आहे. म्हणून मी याबद्दल अधिक खुलासा करू इच्छितो. यात कोणाचा दोष नाही, माझाही नाही, जे काही आहे ते आहे. ते स्वीकारायला मला जवळजवळ दोन दशके लागली. आता संख्या आणि आकडे मला लाजवत नाहीत. माझ्यात स्थान-संबंधी असाधारण क्षमता आहे. आणि मी दुसऱ्या प्रकारे सक्षम आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या आजाराने ग्रस्त लोक संख्या आणि आकडे लक्षात ठेवत नाहीत. संख्या, अक्षरे, शब्द मला गोंधळात टाकतात आणि मला तारखा, नावं यासारख्या गोष्टी लक्षात ठेवणं कठीण होतं.