अभिनेत्री रुबिना दिलैकचा आनंद द्विगुणित, घरात एक नाहीतर होणार दोन मुलांचं आगमन

बिग बॉस 14 ची विजेती रुबिना दिलैकच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. ती तिच्या प्रेग्नेंसी फेजचा खूप आनंद घेत आहे. तिचा आनंद द्विगुणित झाला आहे. 

Updated: Oct 23, 2023, 06:48 PM IST
अभिनेत्री रुबिना दिलैकचा आनंद द्विगुणित, घरात एक नाहीतर होणार दोन मुलांचं आगमन title=

Rubina Dilaik Good News : बिग बॉस 14 ची विजेती रुबिना दिलैकच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. ती तिच्या प्रेग्नेंसी फेजचा खूप आनंद घेत आहे. तिचा आनंद द्विगुणित झाला आहे. रुबिनाने सोशल मीडियावर एक गोड बातमी शेअर केली आहे. खरंतर रुबिनाची बहीण रोहिणी दिलैकही गरोदर आहे. रुबिनाने या आनंदाविषयी इंस्टाग्रामवर सांगितलं आहे.

रुबिना दिलैकची बहीणही गरोदर आहे
रुबिनाने बहीण रोहिणीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की, आम्ही खूप आनंदी आहोत. आमच्या कुटुंबात आनंद द्विगुणित होणार आहे. रोहिणी दिलैक लवकरच आई होणार आहे. चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करून रुबिनाचं अभिनंदन केलं आहे. बिनाची बहीण रोहिणीने सार्थक त्यागीसोबत लग्न केलं आहे. या वर्षी मार्चमध्ये त्यांचं लग्न झालं.

बिग बॉस 14 मध्ये दिसली होती रुबीना-अभिनव
रुबीनाबद्दल बोलायचं झालं तर तिने अभिनेता अभिनव शुक्लासोबत तिने लग्न केलं आहे. दोघंही बिग बॉस 14 च्या घरात एकत्र दिसले होते. अभिनव आणि रुबीनाचं नातं कठीण प्रसंगांना तोंड देत घट्ट झालं आहे. खरंतर, दोघांनी 2018 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या काही काळानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं. मात्र, त्यानंतर हे कपल बिग बॉस 14 मध्ये सहभागी झालं होतं. या शोमध्ये त्यांनी त्यांच्या नात्याला आणखी एक संधी दिली. 

बिग बॉसच्या घरात त्यांचे बंध आणखी घट्ट झाले. आता दोघंही एकत्र खूप आनंदी आहेत आणि लवकरच आई-वडील होणार आहेत. रुबिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तिला तिच्या डेब्यू शो छोटी बहूमधून नाव-प्रसिद्धी मिळाली. रुबीनाचा शक्ती: अस्तित्व के एहसास की हा कार्यक्रमही खूप लोकप्रिय झाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनव शुक्ला यांनी 16 सप्टेंबर 2023 रोजी घोषणा केली होती
बराच काळ आपली प्रेग्नंसी लपवून ठेवल्यानंतर रुबिना आणि तिचा पती अभिनव शुक्ला यांनी 16 सप्टेंबर 2023 रोजी घोषणा केली होती की त्यांच्या घरी एक छोटा पाहुणे येणार आहे. तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केल्यापासून, रुबिना सतत तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर करत आहे.