'मी तुला इतका पगार देतो म्हणत' अभिजीत बिचुकलेकडून करण कुंद्राला या कामाची ऑफर

बिग बॉस 15 मध्ये अभिजित बिचुकले नेहमीच चर्चेत असतो. 

Updated: Feb 25, 2022, 04:12 PM IST
'मी तुला इतका पगार देतो म्हणत' अभिजीत बिचुकलेकडून करण कुंद्राला या कामाची ऑफर title=

मुंबई : बिग बॉस 15 मधीूल कंटेस्टंट अभिजित बिचुकले नेहमीच चर्चेत असतो. आपल्या बेधडक बोलण्यामुळे तो चर्चेचा भाग असायचा. अनेकवेळा अभिजीत त्याच्या वक्तव्यामुळे वादातही सापडला आहे. या शोमध्ये अभिजीतला टॉप 5 मध्ये स्थान मिळवता आलं नाही. शोमधून बाहेर आल्यानंतरही त्याने अनेक विधाने केली होती. अभिजीतने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी त्याने बिग बॉस 15 फेम करण कुंद्राला बेरोजगार म्हटलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बिचुकलेने हे वक्तव्य केलं  आहे.

अभिजीतने ट्विट करून करणला त्याच्या मिठाईच्या दुकानासाठी अॅड करण्याची ऑफर दिली आहे. त्याने ट्विट करत म्हटलं आहे की, प्रतीक, शमिता, तेजस्वी, उमर, सगळेच चांगलं काम करणारे कलाकार त्यांच्या कामात व्यस्त आहेत. पण करण कुंद्रा, तू माझ्या पेढ्याच्या अॅडसाठी मला मदत करशील का? मी  तुला 150 रुपये देईन. अभिजीत बिचुकले बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आला होता. तो बिग बॉस मराठीचा स्पर्धकही राहिला आहे. बिग बॉस मराठीमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतरच तो या शोचा भाग झाला.

करण कुंद्रा लवकरच बिग बॉस 15 ची स्पर्धक आणि गायिका अकासासोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तो नुकताच गोव्यात शूटिंगसाठी गेला होता. जिथले त्याने सुंदर फोटो शेअर केले आहेत.  

करण कुंद्रा सध्या सोशल मीडियावर अनेक मोठ्या ब्रँड्सची जाहिरात करत आहे. नुकतंच त्याने एक फोटोशूट केलं आहे. ज्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर उमर रियाझ आणि प्रतीक सहजपाल यांचे म्युझिक व्हिडिओ रिलीज होणार आहेत.