सलमान खानच्या शोमध्ये 16 वर्षांत कधीच घडलं नाही ते अखेर घडलंच! सर्वांना धक्का

रिएलिटी शो 'बिग बॉस सीझन 17'मध्ये विकी जैनचा एक वेगळा खेळ पाहायला मिळत आहे. विकीचा हा खेळ इतर खेळाडूंपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.    

Updated: Nov 3, 2023, 01:16 PM IST
सलमान खानच्या शोमध्ये 16 वर्षांत कधीच घडलं नाही ते अखेर घडलंच! सर्वांना धक्का title=

मुंबई : रिएलिटी शो 'बिग बॉस सीझन 17'मध्ये विकी जैनचा एक वेगळा खेळ पाहायला मिळत आहे. विकीचा हा खेळ इतर खेळाडूंपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. याच कारणामुळे कधी-कधी बिग बॉस अंकिता लोखंडेचा पती विकी जैनला बिग बॉसचे नियम पाळण्यासाठी सांगतात.

 

सलमान खानचा रिएलिटी शो 'बिग बॉस 17' च्या नुकत्याच समोर आलेल्या भागात नील भट्टला बिग बॉसने थेरपी रूममध्ये बोलावलं होतं. 'गम है किसी के प्यार में' फेम या अभिनेत्याला जेव्हा बिग बॉसने  विचारलं की, तू हृदयाच्या खोलीत काय आहे?  तु कोणावर नाराज आहेस का? यानंतर बिग बॉसच्या या प्रश्नावर नीलने  विकीचं नाव घेत सांगितलं की, त्यांचे विचार एकमेकांशी जुळत नाही. नीलचं हे बोलणें ऐकल्यानंतर बिग बॉसने विकीचं नाव न घेता सांगितलं की, "मी अशा 'अर्धज्ञानी' लोकांबद्दल काहीतरी म्हणालो होतो, जो विचार करतो त्याला हे सगळं माहित आहे."

बिग बॉसशी सहमत होत नील म्हणाला, ''आतापर्यंत मी मैत्री टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला नेहमीच असं वाटायचं की, विकी आणि माझ्यातील बॉन्डिंग तुटू नये.'' बिग बॉसने नीलला समजावून सांगितलं, ''जर मैत्री त्या बाजूनेही खरी असेल तर मला काही सांगण्याची गरज नाही, पण गेल्या सीझनमध्ये मी काही खरी मैत्रीही पाहिली आहे. पण इथे मला काहीतरी वेगळंच वाटतंय."

बिग बॉसची फसवणूक?
बिग बॉस पुढे म्हणाले, ''मला असं वाटतं की, शोच्या आधी  बाहेर भेटून तुमच्या दोघांमध्ये एक करार झाला होता. हे बरोबर आहे का?" नीलने बिग बॉसला सांगितलं की, त्याने स्वतः तसं सांगितलं आहे. बिग बॉसच्या नियमानुसार, 'घरात येण्यापूर्वी स्पर्धक एकमेकांशी बोलत नाहीत', ही एक फसवणूक आहे. बिग बॉसने पुढे सांगितलं की, मला वाटते की, घरात प्रवेश करण्यापूर्वी विकीने काही लोकांना भेटला आणि ते घरात एकत्र राहतील असा करार केला. तो तुलाही भेटला. मला वाटतं विकीने फिनाले गाठण्यासाठी काही पायऱ्या विकत घेतल्या आहेत. कारण पायऱ्या विकीला मदत करण्यात खूप चांगली भूमिका बजावत आहेत. आता बिग बॉसच्या सल्ल्यानंतर नीलच्या खेळात काही बदल होणार की नाही हे पाहणे औत्स्क्याचं ठरेल.