कधी 75 रुपयांसाठी करायचा काम, पण शाहरुखच्या रिजेक्टेड सिनेमात करुन बदलली इमेज, आज 29000000000 संपत्तीचा मालक बनला सुपरस्टार

या फोटोतला मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. ज्याच्या ओळखीसाठी कोणत्या विशेषणाची गरज नाही तर त्याचं नावंच पुरेसं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 11, 2024, 12:23 PM IST
कधी 75 रुपयांसाठी करायचा काम, पण शाहरुखच्या रिजेक्टेड सिनेमात करुन बदलली इमेज, आज 29000000000 संपत्तीचा मालक बनला सुपरस्टार  title=

बॉलिवूडमध्ये सुपरस्टार्सची कमी नाही पण काही कलाकार असे आहेत जे चाहत्यांचे अतिशय फेव्हरेट असतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. या फोटोत दिसणारा लहान मुलगा देखील आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. पण या फोटोत दिसणाऱ्या कलाकाराने सुरुवातीच्या काळात अवघ्या 75 रुपयांत काम केलं आहे. 

75 रुपयांसाठी केलं काम 

आज हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून सलमान खान आहे. सलमान खान आज कोट्यावधी रुपयांचा मालक आहे. पण एकवेळी अशी आली होती तेव्हा त्याला एक एक रुपयासाठी मेहनत करावी लागत होते. 'मैने प्यार किया' सिनेमाच्या अगोदर त्याने छोटे रोल केले होते. 1988 साली त्याला पहिल्यांदा सिनेमांत काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमाचं नाव होतं 'बीवी हो तो ऐसी' ज्यामध्ये सलमान खान खूप छोट्या रोलमध्ये दिसला. सलमान खानची पहिली कमाई ही अवघी 75 रुपयांची होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by S a M e e R (@salmankhanft)

एवढी संपत्ती 

सलमान खानच्या नावे खान कुटुंबाच्या संपत्तीचा अर्धा भाग आहे. एका रिपोर्टनुसार सलमान खानचा नेटवर्थ हा 2900 कोटी रुपये इतका आहे. सलमान खानची एकूण संपत्ती ही 2916 कोटी रुपये उतकी आहे. रिपोर्टनुसार, खान कुटुंबाची एकूण संपती 5259 कोटी रुपये इतरी आहे. 

रिजेक्टेड सिनेमाने चमकलं नशीब 

सलमान खानचा 'मैने प्यार किया' हा सिनेमा चांगलाच चमकला. पण त्याकाळात त्याची इमेज कधी ऍक्शन हिरो तर कधी रोमँटिक हिरो तर कधी कॉमेडी हिरो यामध्येच अडकत राहिली. हा काळ फार मोठा होता. या दरम्यान सलमान खानला एक संधी मिळाली तो सिनेमा म्हणजे 'वॉन्टेड'. प्रभुदेवाने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. या सिनेमाबाबत अशी चर्चा होती की, हा सिनेमा सुरुवातीला शाहरुख खानला ऑफर झाला होती. मात्र काही कारणांमुळे तो हा सिनेमा करु शकला नाही आणि ही संधी सलमान खानला मिळाली. यानंतर सलमान खानची एक वेगळी ओळख निर्माण व्हायला मदत मिळाली.