बिग बॉस फेम ज्योती कुमारीचा जबरदस्त मेकओव्हर!

बिहारमधून आलेली ज्योती कुमारी यंदाच्या बिग बॉसमध्ये एक सर्वसामान्यांमधली स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. 

Updated: Jan 23, 2018, 10:31 PM IST
बिग बॉस फेम ज्योती कुमारीचा जबरदस्त मेकओव्हर! title=

मुंबई : बिहारमधून आलेली ज्योती कुमारी यंदाच्या बिग बॉसमध्ये एक सर्वसामान्यांमधली स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. बांधलेले केस आणि सूट-सलवार घालून बिग बॉसच्या स्पर्धेमध्ये ज्योती पोहोचली होती. आता मात्र ज्योतीचा लूक पूर्णपणे बदलला आहे.

भविष्यामध्ये अभिनेत्री बनण्याचं स्वप्न ज्योतीनं सलमान खानसमोर बोलून दाखवलं होतं. मला अभिनय करण्याची इच्छा असल्याचं ज्योतीनं सांगितलं होतं. 

bigg Boss contestent Jyoti Kumari Doesn’t Transformation Has Made Her Unrecognizable

बिग बॉसच्या घरामध्ये ज्योतीचं विकास गुप्तासोबत सर्वाधिक पटलं होतं. ज्योती आपली छोटी बहिण असल्याचं विकास गुप्ता म्हणाला होता.

bigg Boss contestent Jyoti Kumari Doesn’t Transformation Has Made Her Unrecognizable

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर ज्योतीचा मेकओव्हर झालाय. मेकओव्हर झाल्यानंतर ज्योती सुंदर दिसत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये ज्योती मेकअपमध्ये पाहायला मिळाली नाही.

bigg Boss contestent Jyoti Kumari Doesn’t Transformation Has Made Her Unrecognizable

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर ज्योतीनं तिच्या लूकवर खास लक्ष दिलं आहे. या फोटोमध्ये ज्योतीनं लाल लिप्सटिक लावल्याचं पाहायला मिळत आहे. या नव्या लूकमुळे ज्योती एवढी वेगळी दिसत आहे की तिला ओळखणंही कठीण आहे. 

bigg Boss contestent Jyoti Kumari Doesn’t Transformation Has Made Her Unrecognizable