स्वत:चा जीव संपवायला निघालेल्या गायिकेचा लग्नातील फोटो व्हायरल, सगळेच चकीत

साजचं पंजाब म्युझिक इंडस्ट्रीत मोठं नाव आहे.

Updated: Feb 21, 2022, 01:37 PM IST
 स्वत:चा जीव संपवायला निघालेल्या गायिकेचा लग्नातील फोटो व्हायरल, सगळेच चकीत title=

मुंबई : 'तितलियां गर्ल' म्हणून ओळखली जाणारी गायिका अफसाना खान तिच्या अनोख्या आवाजासाठी ओळखली जाते. 2021 मध्ये जेव्हा तिने सलमान खानच्या लोकप्रिय शो बिग बॉस 15 मध्ये भाग घेतला तेव्हा गायिका प्रसिद्धीच्या झोतात आली.

बिग बॉसमध्ये असताना तिचे इतर स्पर्धकांसोबत होणारे वाद यामुळे ती सतत चर्चेत होती. एवढंच काय तर रागाच्या भरात तिने स्वत:चा जीव धोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामुळे तिला बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आलं होतं. 

बिग बॉसच्या घरात तिने स्वत:चा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळचा तिचा व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता. या शोमध्ये तिला जास्त प्रवास करता आला नाही, पण जोपर्यंत ती राहिली, ती सतत चर्चेत राहिली.

आता अफसाना खानने लग्न केले आहे आणि तिच्या लग्नाला टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. अफसानाने तिचा प्रियकर साजसोबत लग्न केले आहे. साजचं पंजाब म्युझिक इंडस्ट्रीत मोठं नाव आहे.

दोघांचे लग्नाचे फोटो समोर येताच अनेकांसाठी ही बातमी चकीत करणारी होती. कारण बिग बॉसमध्ये मोठा वाद झाल्यानंतर ती बाहेर पडली होती. तो गायक, संगीतकार आणि अभिनेता आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यांचा जन्म 1995 साली मोहाली, पंजाब येथे झाला. त्याने चंदीगड विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. 2015 पासून त्यांनी करिअरला सुरुवात केली. आता संगीत क्षेत्रात 7 वर्षे झाली आहेत.