मुंबई : मराठी बिग बॉस प्रेक्षकांच्या पसंतीला पडू लागलं आहे. दिवसेंदिवस या कार्यक्रमात हटके गोष्टी होत आहेत. बिग बॉसच्या घरात आता अनेक स्पर्धक आपल्या पर्सनल गोष्टी शेअर केल्या जात आहेत. यावरून कुणी कुणाला जज करतंय, तर कुणी यातूनच सिम्पथी मिळवून जात आहे.
मेघा धाडेने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. मेघा धाडे लग्ना आधीच आई बनली असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. लहान वयात झालेली चूक पुढील आयुष्यात खूप महागात पडली असल्याच देखील तीने म्हटलं आहे.
मेघा म्हणाली की, लहान वयात काही चुका माझ्याकडून घडल्या आणि मी अतिशय लहान वयात गरोदर झाले. गरोदर झाल्यानंतरच माझं आयुष्य खूप खडतर होतं. याच काळात माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. माझ्या कुटुंबियांनी वडिलांच्या मृत्यूला मीच जबाबदार असल्याचं म्हटलं. माझा भाऊ माझ्याशी कित्येक वर्ष बोलत नव्हता. पण या सगळ्या खडतर काळात माझ्या आईने मला भरपूर साथ दिली. आणि तिच्यामुळेच मी या क्षेत्रात आली. माझ्या आयुष्यात सुरूवातीच्या काळात माझे घरचे मला समजून घेत नव्हते. तेव्हाच मी बाहेरील लोकांच्या अगदी जवळ जावू लागले. आणि त्याचवेळी माझ्याकडून ही चूक झाली. मी खूपच लहान वयात आई झाली. पण या सगळ्या अडचणींवर मात करत मी माझं करिअर घडवलं.
या सगळ्या प्रकारानंतर माझं करिअरकडे मी लक्ष दिलं, असं मेघा म्हणते. पण माझं कधी लग्न होईल असं वाटलं नव्हतं. पण घरच्यांची खूप इच्छा होती की मी लग्न करावं. म्हणून मी अरेंज मॅरेज केलं. माझे पती नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये व्हॉईस प्रेसिडेंट आहेत. माझ्या नवऱ्याचे हे दुसरे लग्न आहे. त्यांना एक पंधरा वर्षांचा मुलगा असून त्या मुलासोबत माझे नाते एखाद्या मैत्रिणीसारखे आहे. तो मला नावानेच हाक मारतो. माझ्या सासरची मंडळी देखील करियरमध्ये मला खूप सपोर्ट करतात.