Pathaan Bikini controversy: बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) याच्या पठाण चित्रपटातील बिकीनी वाद (Bikini controversy) शमता शमत नाही आहे. हा वाद वाढतच चालला आहे. त्यात या वादावर दररोज अनेक अभिनेता- अभिनेत्री प्रतिक्रिया देत आहे. अशात आता एका मराठीतल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने या बिकीनी वादात उडी घेतलीय. या वादावरील तिच्या प्रतिक्रियेची खुप चर्चा रंगली आहे.
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता गोंदकर (smita gondkar) हिने या वादात उडी घेतलीय. या वादावर प्रतिक्रिया देताना ती म्हणाली की, आता भगव्या रंगाची ब्रा परिधान करायलाही दडपण येत आहे. सध्या रंगावरुन जो वाद सुरु आहे, त्यामुळे भीती वाटत असल्याचं ती म्हणाली आहे.
स्मिता गोंदकर (smita gondkar) पुढे म्हणाली की, भगव्या रंगाच्या बिकीनवरून वाद झाल्यावर आपण आपलं वॉर्डरोब चेक केलं. आपल्या बिकिनी कलेक्शनमध्ये भगव्या रंगाचं काही आहे का याची खात्री केल्याचं तिनं सांगितलं आहे.दरम्यान स्मिता गोंदकर हिच्या या विधानाची आता एकच चर्चा रंगली आहे.
'बेशरम रंग' गाण्यात दीपिकानं परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरून हा वाद सुरु झाला आहे. या वादात अनेक मंत्री, अभिनेते आणि अभिनेत्री प्रतिक्रिया देत असताना अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य (Sant Paramhans Acharya) यांनी शाहरुख खानला धमकी दिली आहे. शाहरुख खान (Shahrukh Khan) भेटला तर त्याला जिवंत जाळेन अशी धमकी देण्यात आलीय.भाजपच्या मंत्र्यांसह विश्व हिंदू परिषदेने (विहिप) तीव्र विरोध दर्शवला असून त्यात बदल करण्याची मागणी केली आहे. तर इतर पक्षांचे नेते आता सिनेमा आणि सिनेमातील कलाकारांना पाठिंबा देताना दिसत आहेत.
दरम्यान बेशरम गाण्यातील बिकिनीवरून वाद सुरू असताना आता या चिपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं नाव 'झूमे जो पठाण' (Jhoome Jo Pathan) असं आहे. झूम जो पठाण या गाण्यात देखील शाहरुख आणि दीपिका दिसत आहेत. 'झूमे जो पठाण' (Jhoome Jo Pathan) हे गाणं बॉलिवूडचा लोकप्रिय प्लेबॅक सिंगर अरिजीत सिंगनं गायलं आहे. या गाण्यात शाहरुख खूपच कूल लूकमध्ये दिसत आहे. तर दीपिकाचा बोल्ड लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
हे गाणं प्रदर्शित होण्याआधीच या गाण्याला पसंती मिळाली होती आणि आता हे गाणं सोशल मीडियावर चांगल ट्रेंड करत आहे.