Animal: टीझरमध्ये 20 सेकंद दिसला, पण चित्रपटात शून्य डायलॉग; बॉबी देओलच्या भूमिकेबाबत सस्पेन्स

Bobby Deol No Dialogues in Animal: अॅनिमल या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यातून बॉबी देओलचाही यात एक वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु या चित्रपटात त्याचा एकही डायलॉग नसल्याची माहिती समोर येते आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 22, 2023, 02:32 PM IST
Animal: टीझरमध्ये 20 सेकंद दिसला, पण चित्रपटात शून्य डायलॉग; बॉबी देओलच्या भूमिकेबाबत सस्पेन्स title=
bobby deol have no dialogues in the film animal latest tredning entertainment news

Bobby Deol Character in Animal: रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा 'अॅनिमल' हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होतो आहे. बॉबी देओलही या चित्रपटातून आपल्याला आगळ्यावेगळ्या भुमिकेतून दिसणार आहे. परंतु या चित्रपटात त्याचे एकही संवाद नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची काहीशी निराशा झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रणबीर कपूरच्या या चित्रपटाची बरीच चर्चा रंगलेली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूरचा रोमान्स पाहायला मिळतो आहे. चित्रपटाचे काही पोस्टर्सही प्रदर्शित झाले असून यावेळी चित्रपटातील दोन गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत.

या चित्रपटचा टीझरही प्रदर्शित झाला. Animal ची आगळीवेगळी थीम पाहून चाहत्यांमध्येही चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. अनिल कपूर, रणबीर कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदाना अशी स्टारकास्ट चित्रपटातून दिसते आहे. 

बॉबी देओलच्या भुमिकेबाबत सस्पेन्स: 

चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या प्रतिक्षेत आहे. त्यावरून नक्की कोणती नवी पात्र समोर येणार अथवा या पात्रांबद्दल आणखी काय नवीन समोर येणार याची बरीच चर्चा सुरू आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, बॉबी देओलचं पात्र हे या चित्रपटातून मुकं दाखवण्यात येणार असल्याचे समोर येते आहे. ट्रेलरमधून नक्कीच काहीतरी वेगळं आणि हटके समोर येईल अशी जोरात चर्चा रंगलेली असताना यावेळी बॉबी देओलच्या पात्राबद्दल असा खुलासा समोर आला आहे. 

हेही वाचा : 10,600,000 तासात 37 लाख व्ह्यूज! 'या' तामिळ चित्रपटाला मागे टाकत शाहरूखच्या 'जवान'चा विक्रम...

किंबहूना एकही संवाद नसल्यानं बॉबी देओल हा मुका विलन असेल आणि आपल्या याच हटके शैलीतून त्याची संपुर्ण चित्रपटात वेगळीच दहशत पाहायला मिळणार आहे. जेव्हा टीझर आला तेव्हा बॉबी देओलचं पात्रं हे फक्त 20 सेकंदापुरतं दाखवलं आणि त्यातूनच त्याचा लुक आणि त्याचं पात्र काहीसं प्रेक्षकांच्या लक्षात आलंय परंतु त्याला एकदी संवाद नसतील असं समोर आलंय. नक्की या चित्रपटातून बॉबी देओल कशा पद्धतीनं समोर येईल याची आता उत्सुकता प्रेक्षकांमध्ये त्यामुळेच निर्माण होते आहे. 

उद्या येणार ट्रेलर भेटीला:

दुबईमध्ये बुर्ज खलिफावर या चित्रपटाचा लुक दाखविण्यात आला होता. तेव्हा संपुर्ण टीम ही दुबईला पोहचली होती. यावेळी या चित्रपटातील रश्मिका आणि रणबीरच्या रोमॅण्टिक सीन्सचीही चर्चा आहे. परंतु त्यावरून ते दोघं हे ट्रोलही झाले होते. उद्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.