मुंबई : गेल्या काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या फोटोत मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री तेजस्विनी लग्नबंधनात अडकल्याचं दिसलं. हा फोटो पाहून अनेकांना धक्का बसला होता. हा फोटो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या फोटोत दोन्ही कलाकार लग्नाच्या वेशात दिसत होते. हा फोटो समोर येताच खूप व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोनंतर आता या दोघांचं लग्न झालंय का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. पण आता आम्ही तुम्हाला या फोटोमागचं सत्य सांगणार आहोत.
व्हायरल झालेले हे फोटो स्वत: तेजस्विनीने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केले होते. हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहील होतं की, ''वयाच्या सोळाव्या वर्षांपासून मला जे गुरु आणि सहकलाकार म्हणून लाभलेले मकरंद अनासपुरे सर , ज्यांच्याबरोबर पाच चित्रपट करण्याचा योग आला आणि त्या चित्रपटांमुळे जी प्रसिद्धी मिळाली आता हीच जोडी तुमच्यासाठी घेऊन येत आहे सहावा सिनेमा धमाकेदार चित्रपट....Stay Tuned'' असं कॅप्शन दिलं होतं. आता या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
महाराष्ट्राचे फेवरेट अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी नव्या कोऱ्या 'छापा काटा' चित्रपटातून धमाकेदार भूमिकेत येत आहेत. 'अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड' प्रस्तुत 'छापा काटा' धमाल विनोदी चित्रपटाचा २१ नोव्हेंबर २०२३ रोजी दणक्यात पोस्टर लॉंच झाला असून रसिक प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटगृहात भन्नाट मनोरंजन अनुभवता येणार आहे.
'ढ लेकाचा' 'कुलस्वामिनी' 'बोल हरी बोल' आणि 'हिरा फेरी' या सुपरहिट चित्रपटांनंतर श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी 'छापा काटा' चित्रपटाची निर्मिती केली असून संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर हे सुप्रसिद्ध अभिनेते प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहेत. या सर्व अभिनेत्यांची झलक असणारा चित्रपटाचा पोस्टर चित्तवेधक असून प्रेक्षकांना जबदरस्त आकर्षित करत आहे.
|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 164/8
|
VS |
GT
165/3(18.4 ov)
|
| Gujarat Titans beat Lucknow Super Giants by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NAM
(49 ov) 198
|
VS |
SCO
199/3(38 ov)
|
| Scotland beat Namibia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.