...म्हणून ट्विंकल दिसताच बॉबी वापरायचा अपशब्द! दोघांमध्ये सतत व्हायची भांडणं

Bobby Deol - Twinkle Khanna : बॉबी देओलनं एका मुलाखतीत त्याच्यात आणि ट्विंकलमध्ये सतत भांडणं व्हायची याविषयी सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 14, 2024, 01:25 PM IST
...म्हणून ट्विंकल दिसताच बॉबी वापरायचा अपशब्द! दोघांमध्ये सतत व्हायची भांडणं title=
(Photo Credit : Social Media)

Bobby Deol - Twinkle Khanna : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलनं 1995 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्याचा पहिला चित्रपट हा 'बरसात' होता. या चित्रपटात त्याच्यासोबत ट्विंकल खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. खरंतर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. छोट्या छोट्या गोष्टींवरून ते भांडायचे. बॉबीच्या भाषेची ट्विंकलला चीड यायची याविषयी बॉबीनं एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

'फिल्मफेयर'शी बोलताना बॉबीनं सांगितलं की चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, ट्विंकलसोबत त्याचं संबंध चांगले नव्हते. त्या दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची. बॉबीनं पुढे सांगितलं की सकाळचं रूटीन आणि साफ-सफाई विषयी बोलून तो ट्विंकलला त्रास द्यायचा. ट्विंकलला हे आवडायचं नाही. त्याशिवाय बॉबी अपशब्द वापरत जसं बोलायचा ते देखील ट्विंकलला आवडायचं नाही आणि हे पाहता बॉबी परत परत तिला चिडवण्यासाठी तसंच करायचा. याविषयी सांगत बॉबी म्हणाला की एकदा सेटवर ट्विंकल बेशुद्द झाली होती. 

बॉबी देओलनं सांगितलं की ट्विंकल बेशुद्ध झाल्यानंतर शूटिंग थांबवण्यात आली होती. त्याचं कारण म्हणजे मनालीच्या जवळ असलेल्या रोहतांगमध्ये ऑक्सिजनची कमी असते, त्यामुळे तर ट्विंकल बेशुद्द झाली नाही. त्यानं चित्रपटाच्या प्रीमियरला सांगितलं की कशा प्रकारे त्या दिवशी ते दोघं एकाच गाडीतून प्रवास करत होते आणि ते दोघं चिंतेत होते. ते चिंतेत तर होतेच त्याचसोबत त्यानं संपूर्ण प्रवासात ट्विंकलचा हात पकडला होता.

दरम्यान, बॉबीनं सांगितलं की त्याला या गोष्टीचं आश्चर्य तेव्हा झालं जेव्हा त्यानं प्रीमियरनंतर ट्विंकलला अपशब्द वापरताना पाहिले. कारण जेव्हा-केव्हा बॉबी सेटवर शिवीगाळ करायचा तेव्हा सेटवर त्याच्याशी भांडायची. जेव्हा तो याविषयी ट्विंकलशी बोलला तेव्हा तिनं हे हसून टाळलं. चित्रपटानंतर बॉबी आणि ट्विंकलनं त्यांच्यातील सगळे मतभेद हे संपवले. तर आता जर ते भेटले आणि त्यावर ते आता हसतात. 

हेही वाचा : 'कभी खुशी कभी गम' मधील शाहरुख आणि काजोलचे डिलीटेड रोमॅन्टिक सीन्स आता होताय व्हायरल

बॉबी देओलच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो 'अॅनिमल' या चित्रपटात सगळ्यात शेवटी दिसला होता. या चित्रपटात त्याची भूमिका खूप कमी वेळासाठी स्क्रिनवर दिसली तरी देखील प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करून गेली. त्याशिवाय तो लवकरच 'आश्रम' या सीरिजच्या पुढच्या सीझनमध्ये दिसणार आहे. तर तो 'कंगुआ' आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटात देखील तो दिसणार आहे.