Bold Photos : टायगर श्रॉफला विसरण्यासाठी दिशा पटानीने बेडरूममध्ये केलं 'हे' काम; फोटो व्हायरल

दिशा पटानीचं टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झालं आहे.

Updated: Aug 13, 2022, 05:04 PM IST
Bold Photos : टायगर श्रॉफला विसरण्यासाठी दिशा पटानीने बेडरूममध्ये केलं 'हे' काम; फोटो व्हायरल title=

मुंबई : दिशा पटानीचं टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झालं आहे. पण तिचा बोल्डनेस कमी व्हायचं काही नाव घेत नाहीये. त्याचबरोबर, टायगर श्रॉफपासून दिशा वेगळी होताच तिने हॉट फोटो शेअर केले आहेत. विशेष बाब म्हणजे या फोटोंमध्ये अभिनेत्री केवळ त्या अभिनेत्यासोबत रोमान्स करताना दिसत नाही, तर तिने सोशल मीडियावर एकापेक्षा एक इंटिमेट सीन्स देतानाचेही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बोल्डनेसचा पारा वाढवताना दिसत आहेत.  

दिशा पटानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर टायगर श्रॉफचं नाव आकांक्षा शर्मासोबत चर्चेत आहे. बातमीनुसार, दिशासोबत ब्रेकअप झाल्यानंतर टायगर आकांक्षाच्या प्रेमात अडकला आहे. त्याचबरोबर दिशा पटानीही तिच्या ब्रेकअपचं दु:ख विसरण्यासाठी तिचा बोल्ड अवतार दाखवत आहे असं म्हटलं जात आहे.

अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर बेडरूमधले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री रिव्हिलिंग कपडे परिधान करून इतका किलर लूक दाखवत आहे की, सर्वत्र या फोटोंची चर्चा आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विशेष म्हणजे बेडरूमच्या फोटोंसोबतच अभिनेत्रीने आणखी काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री जॉन अब्राहमसोबत इंटिमेट सीन देताना दिसत आहे. हा सीन इतका बोल्ड आहे की तो पाहून चाहत्यांनाही घाम फुटला आहे.

आता हा फोटो बघा, ज्यात अभिनेत्री कारच्या बोनेटवर बसून स्माईल देताना दिसत आहे. जे पाहून हे स्पष्ट होतंय की, दिशा पटानी ब्रेकअपचं दु:ख विसरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

खरंतर, अभिनेत्रीचे हे सगळे फोटो तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटातील आहेत. या चित्रपटात दिशाशिवाय जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत होते.