घटस्फोटानंतर आमिर- किरण पुन्हा जगले 'तो' क्षण

ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.  

Updated: Dec 2, 2021, 03:38 PM IST
घटस्फोटानंतर आमिर- किरण पुन्हा जगले 'तो' क्षण
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता आमिर खान आणि त्याची Ex wife किरण राव यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या घटस्फोटाची अधिकृत बातमी जाहीर केली होती. त्यांचं वेगळं होणं सर्वांनाच धक्का देऊन गेलं. पण, असा एक क्षण आला, ज्यावेळी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

हा क्षण या दोघांसाठीही अतिशय महत्त्वाचा होता. यामागचं कारणंही अगदी तसंच होतं. 

आमिर आणि किरण नेमके कोणत्या कारणासाठी एकत्र आले, असाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना? 

तर, ही जोडी एकत्र आली ती म्हणजे त्यांच्या मुलासाठी, आझादसाठी. लेकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून आमिर आणि किरण एकत्र आले. 

शोभा डे यासुद्धा यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी सोशल मीडियावरून या खास सेलिब्रेशनचे फोटोही पोस्ट केले. 

फोटोंमध्ये आमिर, त्याच्या मुलासोबत खास क्षण व्यतीत करताना दिसतोय. तर, किरणही त्याला इथं साथ देताना दिसत आहे. 

आपल्या आई- वडिलांसोबतचे हे क्षण अर्थातच आझादसाठीही तितकेच महत्त्वाचे होते. त्याच्या चेहऱ्यावर याचा आनंद अगदी स्पष्टपणे दिसू लागला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shobhaa De (@shobhaade)

आमिर आणि किरणच्या नात्याची समीकरणं बदलली असली, तरीही ही जोडी मुलासाठी मात्र कायमत एकत्र येते. त्यामुळं आझाद हा त्यांच्यातील दुवा आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.