धक्कादायक : ट्विंकल-अक्षयचा वाद चव्हाट्यावर?

 बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पोल नुकतीच त्याच्या पत्नीने उघड केली आहे. 

Updated: Dec 2, 2021, 03:06 PM IST
धक्कादायक : ट्विंकल-अक्षयचा वाद चव्हाट्यावर?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पोल नुकतीच त्याच्या पत्नीने उघड केली आहे. अभिनेत्रीने तिच्या घराविषयी अशी गोष्ट सांगितली की, जी एकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये अभिनेत्री आपल्या मुलांच्या शाळेची फी स्वत: भरत असल्याचं सांगताना दिसत आहे आणि तिने या व्हिडिओमध्ये यामागचं कारणही सांगितलं आहे.

ट्विंकल खन्ना केवळ अभिनेत्रीच नाही तर ती एक उत्तम लेखिका आणि होस्ट देखील आहे. Tweak India च्या YouTube चॅनेलवर ती वारंवार सेलिब्रिटींच्या मुलाखती घेते आणि त्यांच्या जीवनातील मनोरंजक आणि प्रेरणादायी किस्से समोर आणते. ट्विंकल खन्नाच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये तिची पाहुणी बॉलीवूडची सिमरन म्हणजेच काजोल होती.

अभ्यासाचा खर्च उचलला
तिने काजोलसोबत अनेक मनोरंजक गोष्टी केल्या, मात्र जेव्हा घरखर्चाचा प्रश्न आला तेव्हा ट्विंकल खन्ना म्हणाली की, ती तिच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलते आणि तिने यामागे एक खास कारणही सांगितलं.

ट्विंकल आणि काजोलने अनेक गुपितं उघड केली
ट्विंकल खन्ना काजोलसोबतच्या संवादात म्हणाली, 'आमच्या मुलांच्या शिक्षणाचा सगळा खर्च मी उचलते. कारण मग मी त्यांना सांगू शकेन की तुम्ही शिक्षित असाल तर ते फक्त माझ्यामुळेच. अशातच तिने गंमतीत काजोलसोबत एक अतिशय मजेशीर गोष्ट शेअर केली.

काजोलने सांगितलं की, ती ऑनलाइन बिल भरते तर अजय देवगण ऑफलाइन बिल भरतो. हे दोघं मिळून मुलांच्या शिक्षणाचीही काळजी घेतात. अशा प्रकारे, या व्हिडिओमध्ये काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्याबद्दल खूप मनोरंजक गोष्टी समोर आल्या आहेत.