मुंबई : वयाची पन्नाशी ओलांडली असली, तरीही अभिनेता अक्षय कुमार त्याच्या दमदार व्यक्तीमत्त्वासाठी कायमच चाहत्यांच्या नजरा वळवत असतो. कधी तो एखादा स्टंट करतो, तर कधी एखाद्या कार्यक्रमाला हटके अंदाजात हजेरी लावतो. आता म्हणे हा अभिनेता आणखी एक झटका देत चाहत्यांसमोर आला आहे.
आता तुम्ही म्हणाल त्यानं नेमकं केलं तरी काय? तर, अक्षय कुमारनं नुकतंच त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा एक फोटो शेअर केला. जिथं तो अॅनिमल प्रिंट असणारं एक शर्ट घालून दिसत आहे.
कार्गो पँट आणि अॅनिमल प्रिंटेड शर्ट असा एकंदर लूक त्यानं केला होता. टिंटेड ग्लासनं त्याच्या या लूकला चार चाँद लावले. चाहत्यांसाठी ही बातमी अत्यंत आनंददायी होती. पण, काही फॅशनिस्टांना मात्र त्याचा हा लूक खटकला.
आता हा झाला ज्याच्यात्याच्या पाहण्याचा दृष्टीकोन. 'सूर्यवंशी'च्या प्रमोशनच्या निमित्तानं अक्षय बऱ्याच नवनवीन लूकमध्ये दिसत आहे. काही नव्या गोष्टी आजमावताना दिसत आहे. तुम्ही पाहिला का त्याचा असाच एखादा फोटो?
दरम्यान, येत्या काळात खिलाडी कुमार बऱ्याच मोठ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या मात्र तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणातच अतिशय व्यग्र दिसत आहे.