Akshay Kumar on Films : बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' हा चित्रपट येत्या रक्षाबंधनला प्रदर्शित होणार आहे. त्याचसोबत आमीर खानचा लाल सिंग चढ्ढा हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे यंदा आमीर आणि अक्षय समोरासमोर आहेत.
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार रोमँटिक फिल्म्सपासून अॅक्शन आणि कॉमेडी फिल्म्सपर्यंत सगळ्याच पद्धतीचे चित्रपट करत आला आहे. याचवर्षी अक्षय कुमारला या इंडस्ट्रीत येऊन 30 वर्षे पुर्ण झाली आहे. आपल्या नानाविध भुमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणारा अक्षय कुमार आज बॉलीवूडमधला सर्वाधिक कमाई मिळवणारा (highest paid actor) अभिनेता ठरला आहे. खिलाडी कुमार म्हणून अक्षयची ओळख संपुर्ण इंडस्ट्रीत आहे.
इतके सिनेमे करूनही खिलाडी कुमार मात्र गंभीर झाला आहे. सध्या त्याचे निमित्त ठरले आहे ते त्याच्या 'रक्षाबंधन' या चित्रपटाचे. हा चित्रपट बॉयकॉट करावा अशी अपेक्षा अनेकांनी सोशल मीडियावरून केली आहे. परंतु या सगळ्यातून खंबीरपणे आपला चित्रपट लोकांपर्यंत पोहचवणारा अक्षय कुमार आपल्या नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.
अलीकडेच अक्षय कुमारने एका मुलाखतीत सांगितले की, ''मला वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये माझे अभिनय कौशल्य आजमावायचा आहे. मला कोणत्याही एका प्रकारच्या भूमिकेशी बांधून राहायचे नाही आहे नाही. मी करत असलेले चित्रपट हे कौटुंबिक आणि मनोरंजनपुर्ण असावेत अशी माझी यापुढे अपेक्षा राहिल आणि तसेच चित्रपट मी करायचे ठरवले आहे. मला आता यापुढे घृणास्पद वाटणारे चित्रपट करण्याची मुळीच इच्छा नाही.'', असे गंभीर उत्तर अक्षय कुमारने एका मुलाखतीदरम्यान दिले आहे.
अक्षय कुमार पुढे म्हणाला की, ''माझ्या कामाचे 8 तास बाकी कलाकारांच्या 14-15 तासांच्या बरोबरीचे असतात. मला कधीही घृणास्पद चित्रपट करायचे नाहीत. मग ते कुठल्या जॉनरचे असोत. ते सायको थ्रिलर असोत किंवा सोशल ड्रामा असलेले चित्रपट असोत. माझे सर्व सिनेमे प्रेक्षक कुटुंबासमवेत येतात आणि तेही बिनदिक्कत चित्रपट पाहतात. चित्रपटाचा संदेश आणि विषय हा प्रत्येक कुटुंबाचे मनोरंजन करेल याची मी काळजी घेत आलो आहे आणि यापुढेही घेणार आहेत.'', असेही मतं त्याने पुढे मांडले.
अक्षय कुमारने 'अतरंगी रे', 'सूर्यवंशी', 'गुड न्यूज' आणि 'मिशन मंगल', 'टॉयलेट - एक प्रेम कथा' यांसारख्या चित्रपटांमधून काम केले आहे. अक्षयचा आगामी चित्रपट 'रक्षाबंधन' या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होतो आहे.