राम मंदिरात साफसफाई करण्यामुळे जॅकी श्रॉफ ट्रोल, व्हिडीओ होतोय व्हायरल

Jackie Shroff Video: जॅकी श्रॉफ हे एका राम मंदिराच्या पायऱ्या धुवत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत.

Updated: Jan 16, 2024, 06:02 PM IST
 राम मंदिरात साफसफाई करण्यामुळे जॅकी श्रॉफ ट्रोल, व्हिडीओ होतोय व्हायरल title=

Jackie Shroff Ram Mandir Video : बॉलिवूडचा भिडू म्हणजेच अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff ) हे सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. ते कायमच त्यांच्या साधेपणामुळे चाहत्यांनी मनं जिंकताना दिसतात. जॅकी श्रॉफ यांनी 80-90 या काळात सिनेसृष्टीत स्वत:चा वेगळा दबदबा निर्माण केला. पण तरीही आज ते अत्यंत सर्वसामान्य माणसांसारखं आयुष्य जगताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात जॅकी श्रॉफ हे एका मंदिराच्या पायऱ्या धुवत असल्याचे दिसत आहे. 

नुकतंच 'इन्सटंट बॉलिवूड' या इन्स्टाग्राम पेजने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जॅकी श्रॉफ, अमृता फडणवीस यांच्यासारखे दिग्गज व्यक्ती दिसत आहेत. या व्हिडीओत हे कलाकार मुंबईतील एका राम मंदिराची स्वच्छता करत असल्याचे बोललं जात आहे. या व्हिडीओत अमृता फडणवीस हातात झाडू घेऊन साफसफाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

तर जॅकी श्रॉफ हे स्वत:च्या हाताने राम मंदिराच्या पायऱ्या साफ करताना दिसत आहेत. तसेच ते मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ करताना दिसत आहेत. यावेळी ते झाडांना पाणी घालताना दिसत आहेत. जॅकी श्रॉफ यांनी राम मंदिराच्या पायऱ्या आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करत समाजकार्यात हातभार लावताना दिसत आहेत. मात्र त्यांच्या या कृतीमुळे ते ट्रोल झाले आहेत. 

जॅकी श्रॉफ यांच्या या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. यावर एकाने 'फुकटचा शोऑफ' असे म्हटले आहे. तर एकाने 'आम्ही जर असं काही केलं तर त्याचे शूटींग केलं जाईल का?' असा प्रश्न विचारला आहे. तसेच एकाने 'घरात साफसफाई करण्यासाठी हे लोक नोकर ठेवतात आणि कॅमेऱ्यासमोर हे स्वत: साफसफाई करतात', असे म्हटले आहे. 'कॅमेऱ्याशिवाय हे सर्व कोणी करत नाही', अशी कमेंट एकाने केली आहे. 

Jackie shroff troll

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. येत्या सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी ही सज्ज होत आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत हजेरी लावणार आहेत.