Nawazuddin Siddiqui ची लेक पहिल्यांदाच जगासमोर; तिच्याइतकं Cute कधी कोणी पाहिलंच नसेल

नवाजच्या खासगी आयुष्याचा आणखी एक पैलू सर्वांसमोर आला आहे.   

Updated: Sep 27, 2022, 11:31 AM IST
Nawazuddin Siddiqui ची लेक पहिल्यांदाच जगासमोर; तिच्याइतकं Cute कधी कोणी पाहिलंच नसेल  title=
Bollywood Actor Nawazuddin Siddiqui Daughter Shora photo

Nawazuddin Siddiqui Daughter Shora: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यानं त्याच्या अभिनयाच्या बळावर प्रसिद्धीचा डोलारा उभा केला. अगदी छोटेखानी भूमिकांपासून ते मध्यवर्ती भूमिकांपर्यंतची जबाबदारी त्यानं लिलया पेलली. प्रत्येक वेळी नवाजनं ज्या ताकदीनं पात्र जिवंत केली ते पाहता त्याचं कौतुक करावं तितकं कमीच. 

नवाज जितका त्याच्या चित्रपट आणि कलाकृतींमुळे चर्चेत असतो तितकाच तो त्याच्या खासगी आयुष्यामुळंही प्रकाशझोतात येतो. यावेळी नवाजच्या खासगी आयुष्याचा आणखी एक पैलू सर्वांसमोर आला आहे. 

हा पैलू इतका निरागस आहे, की पाहणारेही त्याकडे पाहतच राहत आहेत. नवाजच्या आयुष्यातील ही खास गोष्ट म्हणजे त्याची लेक शोरा. डॉटर्स-डे (Daughters Day) च्या निमित्तानं नवाजनं मुलीचा फोटो शेअर करत आपण या गोड मुलीचे बाबा असण्याचा आनंद व्यक्त केला. 

'तुझ्या आनंदाशिवाय आणि हास्याशिवाय माझ्या आयुष्यात महत्त्वाचं काहीच नाही....', असं लिहित त्यानं लेकिवरील प्रेम व्यक्त केलं. शोराच्या चेहऱ्यावर असणारे निरागस भाव नेटकऱ्यांच्याही मनाचा ठाव घेऊन गेले. 

खासगी आयुष्याविषयी फारसं मोकळेपणानं न बोलणाऱ्या नवाजनं समोर आणलेला मुलीचा फोटो पाहताना तो एक वडील म्हणून तिच्याप्रती किती जीव ओवाळतो हेच पाहायला मिळत आहे. 

(Nawazuddin Siddiqui Wife) नवाजनं 2009 मध्ये आलिया सिद्दीकीशी लग्न केलं. 2011 मध्ये त्यांच्या आयुष्यात शोराचा प्रवेश झाला. नवाजला शोरा आणि एक मुलगाही आहे. त्याच्या आगामी प्रोजोक्टविषयी सांगावं तर, ‘टिकू वेड्स शेरू’ झळकणार आहे. अभिनेत्री अवनीत कौर या चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.