VIDEO : दीपिकाविषयी पाहुण्यांसमोर हे काय म्हणाला रणवीर....

दीपिका रणवीरपच्या दिमाखदार लग्नसोहळ्याचा उत्साह मात्र काही शमण्याचं नाव घेत नाही आहे.

Updated: Nov 26, 2018, 12:26 PM IST
VIDEO : दीपिकाविषयी पाहुण्यांसमोर हे काय म्हणाला रणवीर....

मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही बॉलिवूडची सर्वात लाडकी जोडी लग्नबंधनात अडकल्यानंतरही या दिमाखदार लग्नसोहळ्याचा उत्साह मात्र काही शमण्याचं नाव घेत नाही आहे. बंगळुरू येथे लग्नसोळ्याच्या निमित्ताने ग्रँड रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. ज्यामागोमाग रणवनीरच्या बहिणीने म्हणजेच रितिका भवनानी हिनेही आपल्या लाडक्या भावासाठी आणि बहिणीसाठी एका पार्टींचं आयोजन केलं होतं. 

रितिकाने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये रणवीर आणि दीपिकाचा खास अंदाज पाहायला मिळाला. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीच्या डिझाईनर पेहरावामध्ये दीप-वीर अगदी वेगळे आणि तितकेच लक्षवेधी दिसत होते. 

सेलिब्रिटी, मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पार्टीचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्यातीलच एका व्हिडिओमध्ये रणवीर चक्क त्याच्या पत्नीविषयी सर्वांसमोर तिची प्रशंसा करत  आहे. 

'मी जगातल्या सर्वाधिक सुंदर महिलेशी लग्न केलं आहे', असं म्हणत रणवीरने दीपिकाची प्रशंसा केली. सोबतच पार्टीसाठी तिने घातलेल्या पेहरावाचीही त्याने प्रशंसा केली. 

 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

पार्टीला येणाऱ्या प्रत्येकाचेच दीपिका आणि रणवीरने मनापासून आभार मानले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहण्यासोबतच त्यांचा उत्साहही पाहण्याजोगा होता. दीप-वीरच्या लग्नाचा उत्साह इथेच थांबला आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये. पुढेही त्यांच्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, येत्या काळात त्याविषयीची माहिती समोर येईलच.