India vs Pakistan : सुपरहिट सामन्यादरम्यान गब्बर-रणवीरची भेट

शिखर धवन, रणवीर सिंहचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Updated: Jun 16, 2019, 05:06 PM IST
India vs Pakistan : सुपरहिट सामन्यादरम्यान गब्बर-रणवीरची भेट title=

नवी दिल्ली : विश्वचषकातील महत्त्वपूर्ण भारत-पाकिस्तान महामुकाबला सुरु झाला आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. या सामन्यादरम्यान शिखर धवन आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो 'आयसीसी'ने (ICC)आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे. या दोन्ही सुपरस्टार्सच्या या फोटोवर चाहत्यांच्या अनेक कमेंट येत आहेत. 

भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान शिखर धवन आणि रणवीर सिंह मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. शिखर आणि रणवीरच्या या हसतानाच्या फोटोला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. 

शिखर धवन भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये सहभागी नाही आहे. शिखर धवनच्या अंगठ्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये दुखापत झाली होती. टीमच्या देखरेखमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहे. 

आज होत असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात शिखर धवनच्या जागी विजय शंकरला खेळवण्यात येत आहे. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी देशभरातून प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये भारताने सहा वेळा पाकिस्तानला मात दिली आहे.