गप्प जागेवर बस; जेव्हा आपल्याच तंद्रीत असणाऱ्या रणवीरला होस्टनं झापलं....

जास्तच दंगा करणं रणवीरला महागात पडलं तेव्हा....

Updated: Sep 7, 2021, 08:04 PM IST
गप्प जागेवर बस; जेव्हा आपल्याच तंद्रीत असणाऱ्या रणवीरला होस्टनं झापलं....  title=
रणवीर सिंग

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग हिंदी चित्रपटसृष्टी आला आणि त्यानं पाहतापाहता आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला. रणवीच्या वाट्याला यश येत गेलं आणि यशशिखरावर तो अगदी सहजपणे चढत गेला. 

रणवीर (Ranveer Singh) हा जितका त्याच्या अभिनयासाठी आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखला जातो, तितकाच तो त्याच्या उत्साही, किंबहुना अतिउत्साही स्वभावासाठीही ओळखला जातो. माध्यमांसमोर येणं असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावणं असो, रणवीरनं कायमच प्रत्येक ठिकाणी त्याची अशी वेगळी छाप सोडली आहे. पण, याच स्वभावानं त्याचा घातही केला आहे. 

अतिउत्साही रणवीरला अभिनेत्री इरा दुबे हिनं चांगलाच ओरडा दिला होता. इरानं एका मुलाखतीत याचा खुलासा केला. आपण स्पष्टवक्ते असल्याचं म्हणत जे मनात ते ओठांवर असाच आपला स्वभाव असल्याचं तिनं सांगितलं. एका कार्यक्रमादरम्यान तिनं रणवीरचा उत्साह पाहिला. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर तिनं रणवीरला इथंतिथं दंगा करताना, गोंधळ घालताना पाहिलं आणि थेट त्याला आपल्या जागेवर जाऊन बसण्यास सांगितलं होतं. 

Shocking : पती रणवीर सिंगविरोधात दीपिकाची तक्रार; वचन तोडलं आणि....

मुलाखतीदरम्यान इरा म्हणाली, 'मी GQ पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करत होते. रणवीरही त्या कार्यक्रमाला उपस्थित होता. तो नेहमीसारखाच (अतिउत्साही) वागत होता. मी अर्थात त्याचा आदर करते, तो एक चांगला अभिनेता आहे. पण, त्यावेळी मात्र कार्यक्रम सुरु झाला होता. मी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते. रणवीर तेव्हा एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर जात होता. इथंतिथं उच्छाद मांडत होता. सर्वांना भेटत होता. गोंधळ घालून आवाजही करत होता. कार्यक्रम सुरु असतानाच त्याचं हे सारं सुरु होतं. त्यामुळे मी त्याला थेट जागेवर बसण्यास सांगितलं होतं. बहुधा त्याला ते आवडलेलं नसावं.'

रणवीरचा स्वभाव सर्वांनाच ठाऊक असला तरीही इरानं दिलेली ही प्रतिक्रिया सर्वांनाच थक्क करुन गेली होती.