अरेरे! सैफ अली खानवर ही काय वेळ, 100 रुपयेही उधार मागावे लागले

संपत्तीच्या बाबतीत सांगावं तर...

Updated: Dec 16, 2021, 11:32 AM IST
अरेरे! सैफ अली खानवर ही काय वेळ, 100 रुपयेही उधार मागावे लागले title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता सैफ अली खान, याला बॉलिवूडचा नवाब या नावानं ओळखलं जातं. कुटुंबाचा वारसा सैफनं पुढे आणला आणि तो कला जगतामध्ये सक्रिय झाला. सध्या देशात नवाबशाही अस्तित्वात नसली, तरीही त्या त्या ठिकाणांवर या मंडळींना आणि त्यांच्या कुटुंबाला कमालीची प्रतिष्ठा आहे. अशाच एका कुटुंबातील एक म्हणजे अभिनेता सैफ अली खान. 

संपत्तीच्या बाबतीत सांगावं तर, श्रीमंती यांच्या घरीच पाणी भरते असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पण, अशी एक वेळ होती जेव्हा याच सैफला दुसऱ्या व्यक्तींपुढे अवघ्या 100 रुपयांसाठी हात पसरावे लागले होते.

सैफवर नेमकी ही वेळ का आली, हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? (Saif ali khan)

एका महत्त्वाच्या आणि तितक्याच अविस्मरणीय प्रसंगी त्याला 100 रुपये उधार घ्यावे लागले होते. 

एका फोटोशूटदरम्यान सैफ आणि अमृता पहिल्यांदाच भेटले होते. त्यावेळी अमृता बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. अमृताला पाहताच सैफनं तिच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. 

अमृतानं मात्र त्याला डेटऐवजी तिच्या घरीच येण्याचं आमंत्रण दिलं. पुढे झालं असं की सैफ अमृताच्या घरी तब्बल दोन दिवस राहिला. घरी परतायची वेळ  आली, तेव्हा मात्र त्याचा खिसा रिकामा होता.

सैफनंच हा किस्सा सांगितला. ज्यानंतर त्यानं अमृताकडे 100 रुपये उधार मागितले. ज्यानंतर अमृतानं थेट त्याला आपल्या कारची चावीच दिली. 

आपण प्रोडक्शनच्या कारनं जाऊ, असं म्हणत सैफनं कार घेण्यास नकार दिला. पण, तू कार ने जेणेकरुन चावी परतवण्याच्या निमित्तानं पुन्हा भेट होईल असं म्हणत एका नव्या नात्याची चाहूल त्यावेळी दोघांनाही लागली होती.

1991 मध्ये सैफ आणि अमृतानं लग्न केलं आणि ते नव्या प्रवासाला लागले. या नात्यातून साला आणि इब्राहिम यांचा जन्म झाला. पण, परस्पर मतभेदांच्या कारणामुळं 2004 मध्ये त्यांनी घटस्फोट घेत हे नातं तिथेच संपवलं होतं