Manoj Tiwari On Gautam Gambhir: ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. यानंतर टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच टीम इंडियाचा माजी खेळाडू मनोज तिवारी याने गौतम गंभीरवर शाब्दीक वार केलाय. टीम इंडियाच्या कोचिंगमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियाचा श्रीलंकेविरोधातील वनडे सिरिजमध्ये 0-2 असा पराभव झाला. यानंतर न्यूझिलंडविरुद्धच्या टेस्ट सिरिजमध्ये 0-3 अशी लाजिरवाणी हार पत्करावी लागली. पुढे ऑस्ट्रेलियासोबत नुकत्याच खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर टेस्ट सिरिजमध्ये 1-3 टीम इंडियाचा 1-3 असा पराभव झाला.
टीम इंडियाचा माजी खेळाडू मनोज तिवारीने गौतम गंभीरवर शाब्दीक हल्लाबोल केलाय. 'गौतम गंभीर पाखंडी आहे. तो जे बोलतो ते तो करत नाही. कप्तान रोहित मुंबईतला आहे. अभिषेक नायर मुंबईचा आहे. रोहितला पुढे करण्यात आलय. जलज सक्सेनासाठी बोलणारा कोणी नाहीय. तो चांगला खेळतो पण शांत राहतो.', असे मनोज तिवारी म्हणाला.
बॉलिंग कोचचा काय फायदा? कोच जे बोलतो ते ऐकलं जातं. मोर्ने मॉर्कल लखनऊ सुपर जाएंट्समधून आलाय. अभिषेक नायक कोलकाता नाइट रायडर्समध्ये गंभीरसोबत होता. तो आपल्या निर्देशांविरोधात जाणार नाही, हे टीम इंडियाच्या कोचला माहिती आहे. गंभीर आणि रोहित शर्मामध्ये सर्वकाही ठिक नाहीय. दोघांच्या नात्यातील तणावाबद्दल मनोज तिवारीने भाष्य केलंय. रोहित शर्मा वर्ल्ड कप विजेता कॅप्टन आहे तर गंभीर आयपीएलपुरता मर्यादित आहे, असा टोलाही मनोज तिवारीने लगावलाय.
'ते एकत्र कसे काम करतील?' रोहित हा विश्वचषक विजेता कर्णधार आहे, तर गंभीरने कर्णधार आणि मार्गदर्शक म्हणून केकेआरला आयपीएल जेतेपद मिळवून दिले आहे. आम्ही सर्वांनी मिळून कामगिरी केली. एकट्या गंभीरने केकेआरला जेतेपद मिळवून दिले नाही. जॅक कॅलिस, सुनील नरेन आणि मी, आम्ही सर्वांनी त्यात योगदान दिले. पण श्रेय कोणी घेतले? असा प्रश्न मनोज तिवारीने उपस्थित केला. असे वातावरण आणि जनसंपर्क आहे ज्यामुळे त्यांना सर्व श्रेय घेता येते, असा टोला मनोज तिवारीने लगावला.
2015 मध्ये रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर गौतम गंभीर आणि बंगालचा तत्कालीन कर्णधार मनोज तिवारी यांच्यात वाद झाले होते. गौतम गंभीर स्लिपमध्ये उभा होता आणि त्याने फलंदाज मनोज तिवारीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. गौतम गंभीर मनोज तिवारीला म्हणाला, 'संध्याकाळी मला भेट, मी तुला मारेन.' याला उत्तर देताना 'संध्याकाळी काय?' चल आता बाहेर जाऊया.' असे मनोज तिवारीने म्हटले होते. माझ्यात आणि गौतम गंभीरमध्ये जोरदार वाद झाला, असे मनोज तिवारीने स्टेडियमबाहेर आल्यावर माध्यमांशी बोलताना सांगितले होते. हे प्रकरण खूप पुढे गेले आहे. गंभीरने मला धमकी दिल्याचे त्याने म्हटले होते. याप्रकरणी गौतम गंभीरला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला होता.