close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...म्हणून पुन्हा लग्न करणार शाहिद

शाहिद... आणि पुन्हा लग्न? 

Updated: Sep 15, 2019, 03:23 PM IST
...म्हणून पुन्हा लग्न करणार शाहिद
...म्हणून पुन्हा लग्न करणार शाहिद

मुंबई : अमूक एक अभिनेत्री किंवा अभिनेता आणि त्यांच्या खासगी आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या काही व्यक्ती यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असते. चाहत्यांच्या या वर्तुळात सर्वांच्याच आवडीचा एक अभिनेता म्हणजे शाहिद कपूर. शाहिदने कायमच त्याचं खासगी आयुष्य आणि चित्रपटांची दुनिया यांमध्ये प्रशंसनीय समतोल साधला आहे. आतातर म्हणे तो पुन्हा एकदा लग्न करण्याच्या विचारात आहे.

शाहिद... आणि पुन्हा लग्न? पडला ना तुम्हालाही प्रश्न? विश्वास बसला नाही तरी ही बाब अगदी खरी आहे. शाहिद कपूर येत्या काळात पुन्हा एकदा लग्न करणार आहे. त्याची पत्नी मीरा राजपूत हिनेच याविषयीचा खुलासा केला आहे. शाहिद दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकण्याच्या विचारात असला तरीही त्याची होणारी पत्नी मात्र मीराच आहे बरं. 

एका मुलाखतीत आपण दोघंही पुन्हा लग्न करत २०१५ मधील विवाहसोहळ्याचे क्षण नव्याने जगणार असल्याची बाब तिने सर्वांसमोर आणली. शाहिद आणि मीराच्या नात्याही ही अनोखी आणि तितकीन निराळी बाजू पाहता याचा साऱ्यांना हेवाच वाटत आहे. 

 
 
 
 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

बॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीला मोस्ट हॅपनिंग जोड्यांमध्ये या जोडीचं नाव घेतलं जातं. २०१५ मध्ये एका अत्यंत खासगी विवाहसोहळ्यात त्यांनी लग्नगाठ बांधली होती. मित्रपरिवार आणि जवळच्या नातेवाईकांची या सोहळ्याला उपस्थिती होती. ज्यानंतर त्यांनी दिल्ली आणि मुंबई येथे दिमाखदार अशा स्वागत समारंभांचं आयोजन केलं होतं. तेव्हापासून सुरु झालेल्या सहजीवनाच्या या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर शाहिद आणि मीराचं नातं अनेकांसाठी आदर्शस्थानी राहिलं आहे.