लग्नाच्याच वाढदिवसावेळी शाहिद- मीराच्या जीवनात नवं वळण

मीराने आकडेमोड मांडत दिली माहिती   

Updated: Jul 7, 2020, 05:24 PM IST
लग्नाच्याच वाढदिवसावेळी शाहिद- मीराच्या जीवनात नवं वळण
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. पण, अखेर शाहिदनं कलाविश्वाशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध नसणाऱ्या एका कुटुंबातील मुलीशी म्हणजे मीरा राजपूत हिच्याशी लग्नगाठ बांधली. पाच वर्षांपूर्वी शाहिदनं मीराला साता जन्मांसाठई साथ देण्याचं वचन दिलं आणि सुरु झाला एक सुंदर आणि तितकाच हवाहवासा वाटणारा प्रवास. 

सहजीवनाच्या याच प्रवासावर निघालेले शाहिद आणि मीरा आज एका अशआ वळणावर आले आहेत, जेथे पोहोचल्यावर खुद्द मीरानं काही आकडे मांडत आपल्या सेलिब्रिटी पतीसोबतचं नातं सर्वांसमोर ठेवलं. इतरांसाठी जरी शाहिद एक सेलिब्रिटी असला तरीही मीरासाठी मात्र तो दररोज तिला आपल्या प्रेमात पाडणारा एक अवलियाच आहे. मीराचं कॅप्शन असाच सूर आळवत आहे. 

वैवाहिक आयुष्याची पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या शाहिदसाठी मीरानं एक सोशल मीडिया पोस्ट करत त्यांचं नातं शब्दांत बांधण्याचा सुरेख प्रयत्न केला आहे. ५ वर्षे, ४ आत्मे, ३ घरं, २ मुलं आणि १ कुटुंब.... अशी सरळ मांडणी करत पुढ मीराने लिहिलं, 'तुझ्याशिवाय मी आणखी कोणासोबतही या आयुष्य नावाच्या प्रवासाला निघाले नसते. दर दिवशी मी आणखीनच तुझ्या प्रेमात पडत आहे. मी या जगातील सर्वात भाग्यवान मुलगी आहे की माझं प्रेमच माझा खास मित्र आहे. सर्व गोष्टींसाठीच मी तुझे आभार मानते. माझी ताकद होण्यासाठी, प्रत्येक टप्प्यावर माझा हात धरुन चालण्यासाठी, मला साथ देण्यासाठी मी तुझी आभारी आहे....'

 
 
 
 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

 

शाहिदवरील प्रेम व्यक्त करत असताना मीराचा काहीसा खोडकर अंदाजही कॅप्शनमध्ये पाहायला मिळाला. जिथं तिनं विसरु नकोस, पत्नी कायमच बरोबर असते असं लिहित जणू त्याला काहीतरी लक्षातच आणून दिलं. सोशल मीडियावर मीराची ही पोस्ट बरीच गाजत आहे. इतकंच नव्हे, तर या जोडीला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनीच शुभेच्छाही दिल्या आहेत.