करिअरमधील सर्वात हिट सिनेमाच्यावेळी पतीचं निधन, पूर्णपणे कोलमडून गेलेली अभिनेत्री... एक असा प्रसंग जेव्हा सलमानच्या लगावली कानशिलात

चित्रपटसृष्टीत सलमान, शाहरुख, करण जोहर, डेव्हिड धवन यांसारख्या अभिनेत्या-दिग्दर्शकांसोबत काम केलेल्या अभिनेत्रीचं रिअल आयुष्य होतं अतिशय खडतर. जिने एकेकाळी सलमानच्या मारली होती कानाखाली. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 27, 2024, 10:35 AM IST
करिअरमधील सर्वात हिट सिनेमाच्यावेळी पतीचं निधन, पूर्णपणे कोलमडून गेलेली अभिनेत्री... एक असा प्रसंग जेव्हा सलमानच्या लगावली कानशिलात

'DDLJ'चे शूटिंग सुरू असतानाच मला अचानक कळले की, माझे पती या जगात नाहीत. माझं संपूर्ण जीवनच स्तब्ध झालं. मेंदू काम करत नव्हता आणि डोळ्यात फक्त अश्रू होते. त्यावेळी क्लायमॅक्समध्ये अनुपम खेरजींसोबत माझा एक शॉट बाकी होता. यशराज युनिटने माझी स्थिती समजून घेतली आणि मला लगेच निघायला सांगितले. मी एकटीने माझ्या पतीचे अंतिम संस्कार केले आणि त्यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन केले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट आणि कठीण काळ होता. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'ची मी एकमेव स्टार कास्ट होते जी क्लायमॅक्समध्ये नव्हती. ही कहाणी आहे 'काटोरी अम्मा'ने घराघरात प्रसिद्ध झालेल्या हिमानी शिवपुरीची. चित्रपटसृष्टीत सलमान, शाहरुख, करण जोहर, डेव्हिड धवन यांसारख्या अभिनेत्या-दिग्दर्शकांसोबत काम केलेल्या हिमानीचे आयुष्य सोपे नव्हते. 

Add Zee News as a Preferred Source

वाईट काळ कधीच विसरत नाहीत

सध्या हिमानी शिवपुरी टीव्ही शो 'हप्पू की उल्टान पलटन'मध्ये कतोरी देवीच्या भूमिकेतून तिच्या चाहत्यांची मने जिंकत आहे. 'हम आपके है कौन', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'हिरो नंबर वन', 'कुछ कुछ होता है' आणि 'कभी खुशी कभी गम' यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. ती तिचा वाईट काळ कधीच विसरत नाही आणि वाईट काळाची सावलीही तिच्या कामावर पडू देत नाही. तिने शाहरुख खान आणि काजोलसोबत 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'मध्ये काम केले तेव्हा अनुपम खेरसोबतची तिची केमिस्ट्री खूप आवडली होती. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये तिचा आणि अनुपम खेरचा एकच शॉट होता पण पतीच्या निधनामुळे ती क्लायमॅक्समध्ये येऊ शकली नाही.

जेव्हा सलमानमुळे हिमानीला फटकारले

हिमानी शिवपुरी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, फ्लोरिडामध्ये 'बीवी नंबर वन'चे शूटिंग सुरू होते. बराच वेळ सलमान सेटवर आला नाही. जे पाहून हिमानी म्हणाली की शूटिंग नंतर होईल. यानंतर ती जवळच्याच मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेली पण जेव्हा ती परत आली तेव्हा डेव्हिड धवन तिच्यावर खूप चिडले आणि तिच्यावर ओरडले. ते हिमानीला म्हणाले की,' तू इथे शूटिंग आणि शॉपिंगसाठी आली आहेस'.

सलमानला मारली कानाखाली 

हिमानीने एका मुलाखतीत सांगितले की, ती 'हम आपके है कौन' या चित्रपटाचे शूटिंग करत होती. सीनमध्ये सलमानला तिला आंटी जान म्हणावं लागलं. दिग्दर्शक सूरज बडजात्याने सीन व्यवस्थित समजावून सांगितला होता पण अचानक सलमानने तिला आपल्या मांडीवर घेतले आणि 'आंटी जान' म्हटले. हा सीनचा भाग नसल्यामुळे हिमानीला राग आला आणि तिने अभिनेत्याला थप्पड मारली.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More