इवलेशे डोळे, छोटंसं नाक अन्...; इलियानाच्या लेकाचे गोंडस फोटो आले समोर

तिने तिचा लेक समुद्राच्या वाळूत खेळताना, गाडीत मजा-मस्ती करताना, झोपलेला असतानाचे काही फोटो एकत्र शेअर केले आहेत. 

Updated: Jun 9, 2024, 07:15 PM IST
इवलेशे डोळे, छोटंसं नाक अन्...; इलियानाच्या लेकाचे गोंडस फोटो आले समोर title=

Ileana Dcruz Son Photo : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं. सध्या इलियाना दो और दो प्यार या चित्रपटामुळे चर्चेत आहे. इलियानाने ऑगस्ट 2023 रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. कोआ फिनिक्स डोलन असे तिच्या मुलाचे नाव आहे. कोआच्या जन्मानंतर आता इलियानाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात इलियानाने तिच्या लेकाचा चेहरा दाखवला आहे. 

इलियानाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने तिच्या लेकासोबत मातृत्वाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीलाच इलियानाने कोआचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने डोक्यावर हॅट, टीशर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. यात ते दोघेही बाहेर फिरताना दिसत आहे. त्यासोबत तिने तिचा लेक समुद्राच्या वाळूत खेळताना, गाडीत मजा-मस्ती करताना, झोपलेला असतानाचे काही फोटो एकत्र शेअर केले आहेत. 

इलियाना घेतेय मातृत्वाचा आनंद

या व्हिडीओला कॅप्शन देताना इलियानाने 'बऱ्याच काळापासून माझे आयुष्य' असे म्हटले आहे. त्यासोबतच तिने हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे. इलियानाने शेअर केलेल्या या व्हिडीओत आई आणि मुलाचे एक गोड नातं पाहायला मिळत आहे.  इलियानाचा हा व्हिडीओ पाहून ती मातृत्वाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. 

इलियानाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. यावर मलायका अरोराने हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. तर अथिया शेट्टीने हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. त्यासोबतच इलियानाच्या अनेक चाहत्यांनीही यावर किती गोड, फारच सुंदर, मस्त अशा कमेंट केल्या आहेत. 

'दो और दो प्यार' चित्रपटामुळे चर्चेत

दरम्यान इलियाना डिक्रूज ही 'दो और दो प्यार' या चित्रपटात झळकली होती. यात तिने नोरा हे पात्र साकारले होते. यात तिच्यासोबत विद्या बालन, प्रतिक गांधी हे कलाकाराही झळकले होते. त्यासोबतच लवकरच ती तेरा क्या होगा लवली या चित्रपटात झळकणार आहे.