'विवाहसोहळ्यांमध्ये नाचत नसल्यामुळं कंगनाला कोणतीच एजेन्सी काम देत नव्हती'

कंगनाचीच कारकिर्दच... 

Updated: Jul 24, 2020, 12:15 PM IST
'विवाहसोहळ्यांमध्ये नाचत नसल्यामुळं कंगनाला कोणतीच एजेन्सी काम देत नव्हती' title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेताsushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या केल्यानंतर त्याभोवती असणाऱ्या बऱ्याच अनुत्तरित प्रश्नांनी आणि वादाच्या मुद्द्यांनी डोकं वर काढलं. यामध्ये सध्याही वादास कारण ठरणारा एक मुद्दा म्हणजे घराणेशाहीचा. अनेक बड्या सेलिब्रिटींना घराणेशाहीच्या कारणास्तव निशाण्यावर घेत अभिनेत्री kangana ranaut कंगना राणौत हिनं पुन्हा एकदा कलाविश्वात तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. 

काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्येही कंगनानं याच मुद्द्यावर परखड मत मांडत काही बॉलिवूड माफियांनीत सुशांतला मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवलं असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं. ज्यानंतर आता अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या नगमा हिनं ट्विटरवर एक मीम शेअर करत खुद्द कंगनाचीच कारकिर्द घराणेशाहीच्या पायावर उभी असल्याची टीका केली. 

Nagma shares image which calls Kangana product of nepotism

ज्यामध्ये सूरज पांचोलीचा उल्लेख कंगनाचा प्रियकर म्हणून करण्यात आला होता. तर, महेश भट्ट, हृतिक रोशन यांच्यासोबतचं तिचं नातं आणि त्यांनी कशा प्रकारे तिच्या कारकिर्दीला हातभार लावला हेसुद्धा नमूद करण्यात आलं होतं. आपल्यावर ही टीका झाल्याचं लक्षात येताच कंगनाच्या टीमच्या वतीनं एका अर्थी कंगनानंच नगमाला उत्तर देत काही गोष्टी स्पष्ट केल्या. 

एकामागोमाग एक ट्विट करत Team Kangana Ranaut या ट्विटर अकाऊंटवरुन लिहिण्यात आलं, 'सूरच पांचोली हा कंगनाचा प्रियकर कधीच नव्हता. हे आधी तिनं अनेकदा स्पष्ट केलं आहे. त्यानं तिला मार्गदर्शन करण्याची हमी दिली होती, पण नंतर मात्र त्यानं शब्द राखला नाही'. पांचोलीकडून कंगनाला मारहाण करण्यात आल्याचंही या ट्विमध्ये लिहिण्यात आलं. 

 

खोटी माहिती पसरवणं थांबव असं नगमाला उद्देशून लिहित कंगनाच्या टीमनं लिहिलं, 'कंगनाला कोणतीच एजेन्सी काम देत नव्हती. कारण ती विवाहसोहळ्यांमध्ये नाचत नव्हती, जिथं लोकं तुमच्यावर पैसे फेकतात. ज्यानंतर रंगोलीनं तिच्या चित्रपटांच्या तारखांचं वगैरेची आखणी करण्यास सुरुवात केली. इंग्रजी भाषा तिलाही येत नव्हती, या चित्रपट व्यवसायाचीही काही माहिती नव्हती. तिनं फक्त तेच केलं जे एक बहीण करु शकत होती. त्यामुळं खोटी माहिती पसरवणं थांबव.' नगमाला उद्देशून कंगनाच्या टीमनं दिलेलं हे प्रत्युत्तर आता या प्रकरणाला अल्पविराम देणार की आणखी नवं वळण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.