वयाच्या 48 व्या वर्षी करिश्मा कपूरने ओलांडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा

करिश्माने नुकताच तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. 

Updated: Aug 31, 2022, 06:41 PM IST
वयाच्या 48 व्या वर्षी करिश्मा कपूरने ओलांडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा title=

Karisham Kapoor Throback Video: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर वयाच्या 48 व्या वर्षीही आपल्या सौंदर्य आणि फिटनेसने तरुण अभिनेत्रींंनाही लाजावून सोडते. Lolo ने मोठ्या पडद्यापासून अंतर ठेवले असले तरी पण ती इंडस्ट्रीतील पार्टीमध्ये तसेच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

करिश्माने नुकताच तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. करिश्मा तिचा हॉट पूल व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट देताना दिसत आहे. 

करिश्मा कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या क्लिपमध्ये ती काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान करून पूलमध्ये पोहताना दिसत आहे.

यावेळी तिनं केसांचा बन बनवून त्यात फुले टाकली आहेत. तसेच तिने मॅचिंग इअररिंग्ससह तिच्या लूकमध्ये थोडं वेगळेपण आणलं आहे. तसेच तिचा नो मेकअप लुकही फार उठून दिसतो आहे. 

करिश्माचा बोल्ड व्हिडिओ समोर आल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. क्लिपला आत्तापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत.

त्याचवेळी चाहत्यांनी लोलोच्या लूकवर कमेंट करून प्रेम व्यक्त केले आहे. एका यूजरला उत्तर देताना लिहिले, 'भारतीय सौंदर्य.' दुसऱ्याने लिहिले, 'स्तुतीसाठी शब्द नाहीत.' दुसऱ्याने लिहिले, 'बॉलिवूडची सर्वात सुंदर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री.' तर करिश्माची चुलत बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी करिश्माच्या लूकवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

करिश्मा कपूरचा हा व्हिडिओ थ्रोबॅक क्लिप आहे.