VIDEO : अर्जुनचा 'तो' अंदाज मलायकाला भावला

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या चर्चेत आहेत ते म्हणजे...

Updated: Nov 27, 2018, 12:56 PM IST
VIDEO : अर्जुनचा 'तो' अंदाज मलायकाला भावला

मुंबई : कलाकार आणि त्यांच्या खासगी आयुष्याविषयीच्या चर्चा नेहमीच मोठ्या उत्सुकतेने ऐकल्या, वाचल्या जातात. मुख्य म्हणजे सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी एक वेगळ्या प्रकारचं कुतूहल अनेकांमध्येच पाहायला मिळतं. अशाच कुतूहलपूर्ण वातावरणात सध्या प्रकाशझोतात असणारे चेहरे म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा. 

अर्जुन आणि मलायका हे दोघंही रिलेशनशिपमध्ये असून, आता टप्प्याटप्प्याने त्यांच्या नात्याविषयीची माहिती समोर येत आहे. नुकतच अर्जुनने 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. 

बहीण जान्हवी कपूर हिच्यासोबत तो या कार्यक्रमात आला होता. त्याचवेळी त्याने आपल्या रिलेशनशिपविषयी एक सूचक वक्तव्य केलं. आपण सिंगल नसल्याचं स्पष्ट करत त्याने लग्नाचे विचारही यावेळी मांडले. अर्थात त्याने कुठेच मलायकाचा उल्लेख केला नाही. पण, तरीही त्यांचं विविध ठिकाणी एकत्र जाणं, एकत्र नवं घर खरेदी करणं या गोष्टी बरंच काही सांगून जातात. 

करणच्या प्रश्नांना सामोरं गेल्यानंतर मलायकाला अर्जुनचा हा अंदाच आणि करणसोबतची त्याची 'कॉफी डेट' बरीच आवडलेली दिसत आहे. करणने सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो पाहून ही बाब लगेचच लक्षात येत आहे. 

'इंडियाज गॉट टॅलेंट' या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या वेळी करणने एक व्हि़डिओ शूट केला ज्यामध्ये तो मलायकाला तुझी कालची 'कॉफी डेट' कशी होती असा प्रश्न विचारत आहे. इथे कॉफी डेट म्हणजेच अर्जुनसोबत मारलेल्या गप्पा कशा वाटल्या असंच त्याने अप्रत्यक्षरित्या विचारलं. 'कॉफी विथ करण' प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवसाची ही गोष्ट आहे. 

करणच्या या प्रश्नाचा अर्थ समजत लगेचच मलायकानेही तिच्या अंदाजात त्याला अपेक्षित असं उत्तर दिलं. 't was hot, it was honest and I loved every bit of it', असं ती म्हणाली. मलायकाने ज्या अंदाजात या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे, ते पाहता तिने एका प्रकारे अर्जुनची प्रशंसाच केली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्यामुळे फार काही न बोलताही बहुचर्चित 'कॉफी डेट'विषयी मलायका बरंच काही बोलली आहे, हेसुद्धा तितकच खरं.