'देसी गर्ल'च्या विदेशी घराची किंमत ऐकून बसेल धक्का

प्रियांकाने नुकतंच हे नवं घर खरेदी केलं आहे.   

Updated: Nov 15, 2019, 03:20 PM IST
'देसी गर्ल'च्या विदेशी घराची किंमत ऐकून बसेल धक्का  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा आणि तिचा पती, अमेरिकन गायक निक जोनास यांनी पाहिलेलं स्वप्न अखेर सत्यात उतरलं आहे. लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच हे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद सध्या या दोघांच्याही नात्यात पाहायला मिळत आहे. आता या सेलिब्रिटी जोडीला आनंद देणारी ही नेमकी बाब कोणती असाच प्रश्न तुम्हालाही प़डला असेलच. 

देसी गर्ल आणि तिच्या पतीच्या आनंदाचं कारण आहे, त्यांचं नवंकोरं घर. हॉलिवूड इंडस्ट्रीत स्थिरावलेल्या प्रियांका चोप्राची दोन मुख्य स्वप्न. एक म्हणजे अमेरिकेत मोठं, आलिशान घर घेण्याचं आणि दुसरं स्वप्न आहे ते आई होण्याचं. यातील कोणती गूड न्यूज आधी येतेय याची तिच्या चाहत्यांनाही उत्सुकता होती.

अशी गूड न्यूज तिच्या चाहत्यांच्या भेटीला आलीसुद्धा. पण, ही गूड न्यूज नव्या पाहुण्याची नव्हे, तर नव्या घराची आहे. 

खरंतर लग्नानंतर प्रत्येक जोडप्याची हीच इच्छा असते की आपलं एक स्वतंत्र मोठं घर असावं. प्रियंका आणि निकनेही हेच स्वप्न उराशी बाळगलं होतं. त्यासाठी दोघेही बरीच मेहनत करत होते. प्रियंका बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये बहुविध भूमिका साकारत आहे, निक हासुद्धा त्याच्या गायनावर लक्ष केंद्रीत करत आपली घोडदौड अधिक वेगवान होण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

या साऱ्यामध्ये इतके दिवस प्रियंका निकच्या जुन्याच घरी रहात होती. आता मात्र या जोडीने अमेरिकेत एक स्वतंत्र घर खरेदी केलं आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये २० हजार चौरस मीटरमध्ये प्रियंका-निकचा या शानदार महाल आहे. प्रियंका-निकच्या या नव्या घराची किंमत ऐकून तुम्ही कदाचित थक्क व्हाल. या घराची किंमत आहे २० मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार तब्बल १४४ कोटी रुपये. या घराचा थाटमाटही या जोडीला शोभेल असाच आहे. या मॉडर्न घरात तब्बल सात बेडरुम असणार आहेत. यावरूनच या घराचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो.

गेल्या वर्षी एक आणि दोन डिसेंबरला प्रियांका आणि निक लग्न बंधनात अडकले. त्यामुळे त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवसही जवळ येत आहे. आता लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन निक आणि प्रियांका या नव्या घरात करणार का, याकडेच चाहत्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.