बोल्ड सीन देणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीची 'ही' काय अवस्था, बाजूनं गेलात तरी ओळखता येणार नाही

तिच्या चेहऱ्यावर असणारी शून्य प्रतिक्रिया.... घाबरवतेय  

Updated: Apr 12, 2022, 11:43 AM IST
बोल्ड सीन देणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीची 'ही' काय अवस्था, बाजूनं गेलात तरी ओळखता येणार नाही title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : काही कलाकार हे त्यांच्या कामामुळे प्रसिद्ध होतात. नावारुपास येतात. त्यांना मिळणारं कामही त्यांच्या कलेच्याच बळावर असतं. अशाच कलाकारंमध्ये एका अशा अभिनेत्रीचा समावेश आहे, जिनं तिच्या अभिनयानं कायमच प्रेक्षकांना थक्क केलं. (Bollywood )

गंभीर भूमिका असो, न्यूड सीन असो किंवा मग एखादा बोल्ड सीन. तिनं प्रत्येकवेळी आपल्या कलेचं कसब दाखवून दिलं. पण, आता मात्र तिचं पूर्ण बदललेलं रुप पाहायला मिळत आहे. 

कातरलेले केस, मळलेला चेहरा काळवंडलेले डोळे, असं तिचं एकंदर रुप पाहायला मिळत आहे. तिच्याकडे पाहता शेजारून गेलो तरी ओळखता येणार नाही, अशीच प्रतिक्रिया तुम्ही द्याल. 

आपल्या रुपानं सर्वांनाच घाबरवणारी ही अभिनेत्री आहे, राधिका आपटे  (Radhika Apte). 

तिनं शेअर केलेला हा फोटो 2016 मधील  'पार्च्ड' या चित्रपटादरम्यानचा आहे. फोटो शेअर करतानाच तिनं तो किती जुना आहे, याचा अंदाज चाहत्यांना दिला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

'पार्च्ड' हा एक असा चित्रपट ज्याचा जागतिक स्तरावर बरंच कौतुक मिळालं. यामध्ये तिनं अभिनेता आदिल हुसैन याच्यासोबत इंटिमेट सीन दिला होता. या सीनची बरीच चर्चा झाली, काहींनी या दृश्यामुळं तिला कडू बोलही सुनावले.