मुंबई : जवळपास दोन- तीन वर्षांपासून अभिनेत्री सुष्मिता सेन एका सुरेख नात्याच्या वलयामध्ये होती. हे नातं होतं, प्रेमाचं आणि आपुलकीचं. रोमन शॉल नावाच्या मॉडेलसह ती रिलेशनशिपमध्ये होती. सुष्मिताचं हे नातं सर्वांनाच हेवा वाटावं असं होतं. (Sushmita Sen)
वर्ष उलटली, पाहता पाहता नात्याची समीकरणंही बदलली. 2021 हे वर्ष संपण्यासाठी काही दिवस उरलेले असतानाच सुष्मितानं रोमनशी असणारं नातं आता संपुष्टात आल्याचं जाहीर केलं.
मैत्रीपासून या नात्याची सुरुवात झालेली आणि आपण कायम मित्रच राहू, असं म्हणत तिनं हे नातं केव्हाचंच संपल्याचं सांगितलं.
खासगी जीवनात तिच्यासाठी ही एक मोठी घटनाच होती. सारंकाही असूनही सुष्मिता खऱ्या प्रेमासाठी पुन्हा एकदा आसुसली.
वर्षाच्या शेवटी ही सौंदर्यवती पुन्हा एकटी पडली. आता तुम्ही म्हणाल असं नेमकं काय झालं, की तिचं ब्रेकअप झालं?
अर्थात का, कसं, कुठे या प्रश्नांची उत्तरं सुष्मिता आणि रोमनकडेच आहेत. थोडक्यात काय, तर 2021 हे वर्ष मागे जात असतानाच आता सुष्मितानं एक पोस्ट लिहित सारांश सर्वांपर्यंत आणला आहे.
'एका मुलीला प्रशंसा कधीही आवडते. मी त्या बाबतीत नशिबवान आहे, कारण माझ्या जीवनात प्रशंसेचा पूर आहे.
तुम्ही सर्वजण माझ्या आयुष्याता अविभाज्य भाग आहात, माझ्या या प्रवासावर विश्वास ठेवण्यासाठी मनापासून आभार.
2021 चांगलं वर्ष होतं. अनेक चछ-उतार आले.. (हा आलेख ज्याला आयुष्य म्हणतात.)', असं तिनं लिहिलं.
जीवनात मोठे बदल झालेले असले तरीही तिनं सर्वांनाच नव्या वर्षासाठी शुभेच्छा देत आनंदी राहण्याचा कानमंत्र दिला आहे. सोबतच चाहत्यांचे मनापासून आभारही मानले आहेत. सुष्मिताची ही पोस्ट सर्वांच्या नजरा वळवत आहे.