मुंबई : एआयएमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण ( AIMIM leader Waris Pathan) यांनी केलेल्या एका भाषणामुळे सर्वच स्तरांमधून आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. फक्त राजकीयच नव्हे तर, कलावर्तुळातूनही आता पठाण यांना वादग्रस्त वक्तव्यावरुन निशाण्यावर घेण्यात येत आहे. ज्यामध्ये आता एका अभिनेत्रीने बैठ जाओ चचा! असं म्हणत त्यांना एक प्रकारचा इशाराच दिला आहे.
एनआरसी आणि सीएएचा मुद्दा असो किंवा मग आणखी कोणता मुद्दा. प्रत्येक वेळी आपली ठाम भूमिका मांडणारी ही अभिनेत्री आहे स्वरा भास्कर. स्वराने नुकत ट्विट करत वारिस पठाण यांच्यावर शाब्दिक तोफ डागली आहे.
पठाण यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत स्वराने लिहिलं, 'बैठ जाओ चचा! तुम्ही जर काही चांगलं बोलू शकत नाहीत तर, किमान इतकं मोठं, तथ्यहीन तरी बोलू नका. यामुळे फक्त नुकसानच होणार आहे.' स्वराने ट्विट करत केलेली आगपाखड पाहता ती पुन्हा एकदा समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात उभी ठाकली आहे असं म्हणायला हरकत नाही.
बैठ जाओ चचा! If you cannot say something helpful don’t say it at all! Stupid, irresponsible and highly condemnable statement !!! Such talks only harm the movement! #shame https://t.co/sIsxLMSkZZ
— Swara Bhasker (@ReallySwara) February 20, 2020
काय म्हणाले होते वारिस पठाण?
कर्नाटकमधील गुलबर्गा येथे पठाण यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींनाही भारी आहोत. लक्षात ठेवा ही गोष्ट; असं सांगत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. CAA विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी १५ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावेळी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी हे देखील उपस्थित होते.