साक्षी तन्वरला कलाविश्वातून धमकी

जाणून घ्या तिला कोणी धमकावलं होतं

Updated: Sep 11, 2019, 07:56 AM IST
साक्षी तन्वरला कलाविश्वातून धमकी
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मालिका विश्वातून आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करणाऱ्या साक्षी तन्वर हिने अनेकस वर्षे छोटा पडदा गाजवला. 'बडे अच्छे है' या मालिकेत तिने साकारलेली प्रिया तर अनेकांच्याच आवडीची. साक्षीच्या कारकिर्दील मैलाचा दगड ठरलेली अशीच एक मालिका होती 'कहानी घर घर की'. याच मालिकेदरम्यान, तिला धमकावण्यात आलं होतं. ही धमकी दिली होती कलाविश्वातीलच एका व्यक्तीने. 

कलाकारांना बाहेरुन येणारे धमकीचे फोन वगैरे या गोष्टी अनेकदा घडत असतात. पण, साक्षीला  मात्र याच वर्तुळातून धमकावण्यात आलं होतं. तिला ही धमकी दिली होती, एकता कपूर हिने. येत्या काही दिवसांमध्ये साक्षी भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित एका वेब सीरिजमधून झळकणार आहे, त्याचविषयी अनुपमा चोप्रा यांच्याशी एका मुलाखतीच्या सत्रात तिने हे धमकी प्रकरण उघड केलं. 

'कहानी घर घर की, या मालिकेची लोकप्रियता, टीआरपी कमी झाल्याचं लक्षात येताच एकताने थेट मालिकाच बंद करणार असल्याची धमकी दिली. त्यावेळी आम्ही सर्वच घाबरलो होतो. एकताला नेमकं हवं तसं आणि त्याच पद्धतीने दृश्याचं चित्रीकरण करण्यासाठी आम्ही जवळपास १६ तासांसाठी चित्रीकरण करत होतो', असं साक्षी म्हणाली. 

सध्याच्या घडीला साक्षी आणि एकता अतिशय चांगल्या मैत्रीणी असल्या, तरीही गतकाळात मात्र त्यांचं नातं फक्त कामापुरता सीमीत असून, अतिशय औपचारिक पद्धतीचं होतं. मालिकेच्या सेटवर आठवड्यातून फक्त एकदा- दोनदाच एकताला भेटण्याची संधी त्यांना (कलाकारांना) मिळत होती. मुळात एकताविषयी त्यांच्या मनात एक प्रकारच्या भीतीने घर केलं होतं. याविषयीच सांगताना साक्षी म्हणाली, ''फोनवर सतत 'एकता' असं नाव दिसू लागलं की समजावं ओरडा मिळणार आहे.''

साक्षीसोबत या मुलाखतीला एकताचीही उपस्थिती होती. जेव्हा तिने आपल्याविषयीची भीती आजच्या घडीलाही कायम असल्याचं सांगितलं. सोबत आपण गेल्या काही वर्षांमध्ये रागावर नियंत्रण ठेवण्यास शिकलो असल्याचंही ती म्हणाली. 

 
 
 
 

A post shared by Erkrek (@ektaravikapoor) on

टेलिव्हिजन विश्वात विविध मालिकांची निर्मिती करणाऱ्या एकता कपूर हिला 'डेलीसोप क्वीन' म्हणून ओळखलं जातं. तिची निर्मिती असणाऱ्या अनेक मालिकांतून आजवर विविध चेहऱ्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यातीलच एक नाव म्हणजे साक्षी तन्वर. एकेकाळी अतिशय मोजकं बोलणाऱ्या आणि औपचारिक नातं असणाऱ्या या दोघीजणी आज मात्र एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रीणी आहेत.