मुंबई : चित्रपटात एकत्र काम करताना बॉलिवूड स्टार्स कधी एकमेकांच्या प्रेमात पडतात हे त्यांनादेखील कळत नाही. एक भूमिका कलाकारांच्या आयुष्यात नवीन लव्हस्टोरीच्या सुरुवातीचं कारण बनतं. आज आपण त्या बॉलीवूड कपलबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांच्या लव्हस्टोरी गॉसिप्सच्या कॉरिडॉरमध्ये आगीसारख्या पसरल्या, मात्र त्यांच्या लव्हस्टोरीचा अंतही दुःखद ब्रेकअपने झाला. या यादीत अनेक सेलेब्सची नावं आहेत.
शाहिद कपूर आणि करीना कपूर
शाहिद कपूर आणि करीना कपूर यांची लव्हस्टोरी ही बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली लव्हस्टोरी आहे. दोघं जवळपास 5 वर्ष एकमेकांना डेट करत होते. 2006 मध्ये करीना 'जब वी मेट' आणि 'टशन' या दोन्ही चित्रपटांसाठी एकत्र शूटिंग करत होती. 'टशन'च्या सेटवर करीना सैफ अली खानच्या प्रेमात पडली, त्यानंतर 'जब वी मेट' रिलीज होण्यापूर्वीच करिनाने शाहिदसोबत ब्रेकअप केलं. करीना आणि शाहिदचं ब्रेकअप हे बॉलिवूडमधील सर्वात धक्कादायक ब्रेकअप होतं.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्हस्टोरी 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाली होती पण ते जास्त काळ एकमेकांसोबत राहू शकले नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानच्या हिंसक स्वभावामुळे त्याचं ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झालं होतं. ऐश्वर्याच्या आई-वडिलांनी सलमानविरुद्ध पोलिसांत तक्रारही केली होती.
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या लव्हस्टोरीपासून ते त्यांच्या ब्रेकअपपर्यंतचे किस्से आजही गॉसिप्सच्या गल्लीबोळात प्रसिद्ध आहेत. 'बचना ए हसीनो' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघंही एकमेकांना प्रेमात होते. दीपिकाही 'मिसेस कपूर' बनण्याचं स्वप्न पाहू लागली. मात्र कतरिना कैफमुळे दीपिकाचं स्वप्न भंग झालं. दीपिकाची फसवणूक करून रणबीर कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये आला.
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ
रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या लव्हस्टोरीमुळे केवळ दीपिकाच नाही तर सलमान खानही दुखावला गेला होता. सलमानचे चाहते कतरिनाला 'मिसेस खान' म्हणून पाहू लागले, पण कतरिनाने सलमानचं मन मोडून रणबीरचा हात धरायला वेळ लावला नाही.