तारे जमीन पर! बच्चन कुटुंबापासून ते कपूर कुटुंबापर्यंत स्टार्सचं दिवाळी सेलिब्रेशन, पाहा फोटो

दिवाळी म्हणजे दिव्यांचा, सुखाचा आणि आनंदाचा सण. 

Updated: Nov 5, 2021, 06:42 PM IST
तारे जमीन पर! बच्चन कुटुंबापासून ते कपूर कुटुंबापर्यंत स्टार्सचं दिवाळी सेलिब्रेशन, पाहा फोटो title=

Bollywood Celebs Diwali Celebration : दिवाळी म्हणजे दिव्यांचा, सुखाचा आणि आनंदाचा सण. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे दिवाळी सण साजरा करण्यावर निर्बंध होते. पण यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे आणि देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. गरीबांपासून श्रीमंतापर्यंत आनंदाचा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होता. 

यातही सेलिब्रेटींची दिवाळी म्हटलं की बात काही औरच. बच्चन कुटुंबापासून कपूर कुटुंबापर्यंत दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी बच्चन कुटुंबाने एकत्र लक्ष्मीपूजन केलं. यावेळी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय यांच्यासह सर्व सदस्यांनी पांढऱ्या रंगाचे पोशाख परिधान केले होते. कारमध्ये बसलेल्या बच्चन कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बच्चन कुटुंबाप्रमाणेच कपूर कुटुंबातील मुलींनीही दिवाळी उत्साहात साजरी केली. करिश्मा आणि करीना दिवाळीला एकत्र दिसल्या. करीना कपूरने दिवाळीला गुलाबी कलरचा सूट परिधान केला होता, तर करिश्माही फिकट हिरव्या रंगाच्या पोशाखात दिसली. त्यांचे ग्लॅमरस् फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झासाठी ही दिवाळी खास आहे. या वर्षी तिने वैभव रेखीसोबत लग्न केले आणि ती एका मुलाची आई देखील आहे. पती आणि मुलासोबत तिनेही दिवाळी उत्साहात साजरी करतेय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

श्रीदेवीच्या मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांनीही दिवाळी साजरी केली. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जान्हवी निळ्या रंगाच्या लेहेंग्यात तर खुशी हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात दिसली. दोन्ही बहिणींनी त्यांच्या आईप्रमाणे कपडे घातले होते. व्हिडिओमध्ये जान्हवी आणि खुशी वडील बोनी कपूरसोबत पोज देताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मलाइका अरोरानेही तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत दिवाळी साजरी केली.  साजश्रुंगार करत मलायका अर्जुनच्या घरी पोहोचली होती. मलायका गुलाबी रंगाच्या साडीत सुंदर दिसत होती तर अर्जुन कपूर काळ्या कुर्त्यात दिसला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बॉलिवूड स्टार्सनी सजावट करून दिवाळी साजरी केली. यावेळी अक्षय कुमार (Akshay Kumar) ते शहनाज गिल (Shehnaaz Gill), मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee), सायरा बानू (Saira Banu), मंदिरा बेदी (Mandira Bedi) आणि हिना खान (Hina Khan) यांच्यासह अनेक टीव्ही आणि बॉलीवूड सेलिब्रिटींनी उत्सव साजरा केला नाही कारण या स्टार्सनी आपले प्रियजन गमावले आहेत.