Raj Kundra Porn Business Case : आतापर्यंत वादाच्या भोवऱ्यात अडकले 'या' कलाकारांचे पार्टनर

या कारणामुळे कलाकार कायमच चर्चेत 

Updated: Jul 21, 2021, 02:53 PM IST
Raj Kundra Porn Business Case :  आतापर्यंत वादाच्या भोवऱ्यात अडकले 'या' कलाकारांचे पार्टनर  title=

मुंबई : ग्लॅमरस वर्ल्डच्या झगझगत्या दुनियेत कलाकारांच आयुष्य कधीच खासगी राहत नाहीत. तसेच कलाकारांशी संबंधीत वादग्रस्त गोष्टी कायमच चर्चेत असतात. बी-टाऊन सेलेब्सला कधी स्वतःमुळे तर कधी आपल्या जवळच्या व्यक्तीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकावं लागलं आहे. आपल्या पार्टनरमुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकार ट्रोलिंग किंवा वादामुळे चर्चेत राहिली आहे. 

शिल्पा शेट्टी - राज कुंद्रा 

नुकतंच शिल्पा शेट्टी आमि राज कुंद्रा हे नाव चर्चेत आहे. या दोघांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. पोर्नोग्राफी कंटेट केसमध्ये राज कुंद्रा 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहे. यामुळे शेट्टी आणि कुंद्रा कुटुंबात मोठं टेन्शन आहे. शिल्पाने सध्या आपल्या सगळ्या कामांपासून ब्रेक घेतला आहे. सिनेमाचं प्रमोशन आणि डान्स रिऍलिटी शो सगळ्या गोष्टी थांबवल्या आहेत. ती आता आपल्या कुटुंबासोब आहे.

राज कुंद्रा पॉर्न फिल्म बनवून मोबाइल ऍपवर टाकण्याचा आरोप करण्यात आला. या अगोदरही राज कुंद्रा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सट्टेबाजी करणे, आयपीएल फिक्सिंग करणे, अंडरवर्ल्ड डील करणे या ना अशा अनेक कारणांमुळे राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

रणवीर सिंह- दीपिका पदुकोण 

2020 हे वर्ष बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणकरता अतिशय खराब आहे. नंबर 1 हिरोइनचा टॅग लागलेली दीपिका पदुकोणला ड्रग्स केसमुळे एनसीबीसमोर उभं रहावं लागलं होतं. दीपिका पदुकोणचं नाव यामध्ये येणं हेच चर्चेच होतं. दीपिका या दरम्यान खूप ट्रोल झाली. 

भूषण कुमार - दिव्या खोसला कुमार 

भूषण कुमार जो टी सीरीजच्या कंपनीचे मालक आहेत. दिव्या खोसला कुमार त्यांची पत्नी आहे. भूषणवर अनेक महिलांनी काम दिल्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. भूषण कुमारने कायमच या आरोपांना खोटं ठरवलं आहे. 

संजय दत्त - मान्यता 

संजय दत्तने अनेक वर्षे कारागृहात घालवली आहेत. टाटा आणि आर्म्स एक्टमुळे संजय दत्तला कारागृहात रहावं लागलं.